बळवंत मनवर/पुसद
__________________________
यवतमाळ नजीक भोयर गावाच्या ई-क्लास वसाहती मधे विश्वभूषण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती भिमशक्ती नव यूवक मंडळाच्या वतीने प्रथमतः साजरी करण्यात आली.प्रमूख पाहूणे व मार्गदर्शक ॲड.श्याम खंडारे ऊपस्थित होते,कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मंडळाचे अध्यक्ष मा.लखन देवरे होते. डोंगर कपाती मधे वसलेल्या ह्या वसाहती मधे किमान दोनशे घराच्या वस्तीत आदिवासी 90% व 10% बौध्द समाज वास्तव्याला आहेत, दोन्ही समाज बांधव एकोप्याने सर्व संकटावर मात करत समस्यांचा डोंगर अंगावर झेलत मूलाबाळासह जिवन जगत आहेत ,ह्या वसाहती मधे दोनशे घरासाठी फक्त एक बोअरवेल आहे,त्यातील पाणी पिण्यालायक नाही किमान तीन कि.मी.वरून पाणी आणावे लागते,विद्यूत नाही,जोडरस्ता व अंतर्गत रस्ते नाही,अंगणवाडी नाही, घरकूल योजना पोहचली नाही,आरोग्य सेवा नाही,विस वर्षापासून ह्या वसाहतीमधे लोक ई-क्लास जागेवर अतिक्रमण करून राहात आहेत, मात्र घरे नियमानूकूल करण्यासाठी सरकारी यंत्रणेकडून व लोक प्रतिनिधी कडून दूर्लक्ष
होत आहे.,मात्र ह्या लोकांचे मतदान आहे.मतदानाच्या वेळीच काय ते राजकारण्यांचे पाय येथे पडतात व आश्वासने देवून मतदान घेतले की पून्हा फिरकूनही पाहात नाहीत.
यवतमाळहून फक्त पाच कि.मी.अंतरावर असलेल्या ह्या वसाहतीवर कोणाचेही लक्ष जावू नये व दोनशे घरातील एक हजार लोक राज्याच्या व केंद्राच्या सर्व लाभाच्या योजनेपासून व विकास प्रक्रीयेतून वंचीत राहावे हे मानवतेच्या अवहेलनेचे वास्तव जिल्ह्याच्या लोक प्रतिनीधी साठी शासकीय व प्रशासकीय यंत्रनेसाठी लाजीरवाणी आहे.अशी खंत व्यक्त करीत डाॅ.बाबासाहेबांनी संविधानातून दिलेल्या सर्व मूलभूत हक्कापासून येथील आदिवासी व बौध्द समाज वंचीत आहेत. जिल्हा प्रशासनाने मानवतेच्या व समतेच्या दृष्टीकोनातून ह्या वसाहतीमधील लोकांचे प्रश्न सोडवावेत अशी विनंती प्रशासनाला ॲड.श्याम खंडारे ह्यांनी या प्रसंगी केली.
रोजमजूरी करीत आपल्या कूटूंबाच्या पोटाची खळगी भरतांना येथील लोकांना आपल्या न्याय्य मागण्या साठी संघर्ष करायला ,आंदोलने व ऊपोषण करायला व प्रश्न शासन दरबारी मांडायला सूध्दा सवड मिळत नाही .येथील लोकांना त्यांचे हक्क व न्याय मिळवून देणे हे फार मोठे आव्हान असून *वंचीत व ऊपेक्षीतांना न्याय मिळवून देणे हीच भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ह्यानी दिलेल्या संविधानात्मक मूल्ये व विचारांना खरी आदरांजली ठरेल* असे विचार व्यक्त केले.
बौध्दवंदना ,पंचशील व संस्कार पूजा पाठ तथा महामानवांना मानवंदनेचा कार्यक्रम सौ.कवाडे काकूनी त्यांच्या सहकारी महीला मंडळामार्फत पार पाडला. ह्या प्रसंगी ॲड.श्याम खंडारे ह्यांनी डाॅ.बाबासाहेबांच्या जिवनातील अतिशय मोलाचे देशाला दिलेले योगदान भारतीय संविधान व भगवान बूध्द आणि त्यांचा धम्म ही पूस्तके मंडळाला प्रदान केलीत. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे ऊपाध्यक्ष सतिश खोब्रागडे,कोषाध्यक्ष आकाश खडसे,सचीव प्रवीण पाटील,सदस्य गजानन खडसे,रमेश पेटकूले व मंडळाचे समस्त सहकारी,महीला मंडळ ई.नी परिश्रम घेतले. आदिवासी तथा बौध्द बांधव व महीला मोठ्या संख्येनी कार्यक्रमाला ऊपस्थित होते.ऊत्कृष्ट सूत्र संचालन गौतम दामोधरे ह्यांनी केले तर ऊपस्थितांचे व पाहूण्याचे आभार प्रियंका खोब्रागडे ह्यानी मानले.