इस्लामपूर दि. १७ दि (प्रतिनिधी)
इकबाल पीरज़ादे
इस्लामपूर बिजनेस फाेरम यांच्यावतीने आयाेजित माेफत करिअर मार्गदर्शन सेमिनार उत्साहात संपन्न झाला.
इस्लामपूर बिजनेस फाेरम यांच्या वतीने इ. ११ वी मध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांसाठी माेफत करिअर मार्गदर्शन सेमिनार चे आयाेजन येथील द मल्हार हाॅटेल मध्ये करण्यात आले हाेते. या सेमिनारमध्ये ‘करिअर कसे निवडावे’ या विषयी शैक्षणिक सल्लागार प्रा. डाॅ. नितीन कदम यांनी सखाेल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला हाेता.
प्रारंभी इस्लामपूर क्रेडाईच्या अध्यक्षपदी उमेश रायगांधी व वाळवा तालुका इंजि. असाे अध्यक्षपदी सत्यजित पाटील यांची निवड झाल्याबद्दल व परम संदीप पाटील यांची देशामध्ये 165 व्या क्रमांकाची केंद्रीय सैनिक स्कूल चंद्रपूर या ठिकाणी निवड झाल्याबद्दल डाॅ. नितीन कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डाॅ. कदम यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. तसेच या निर्णायक वळणावर करिअरच्या दृष्टीने याेग्य मार्गदर्शन मिळणे अत्यावश्यक असते. करिअरच्या विविध वाटा काेणत्या, एखादे क्षेत्र निवडताना त्याबद्दलची माहिती कशी मिळावावी याचे संपूर्ण मार्गदर्शन यावेळी डाॅ. कदम यांनी दिली.
शहाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विश्वजीत पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रविण पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास जयदिप पाटील, भगतसिंग पाटील, माेहन जाधव, उदय देसाई, प्रविण फल्ले, नितिन फल्ले, प्रशांत जाधव, अतुल पवार, विठ्ठल मलगुंडे, डि. एम. पाटील, राहुल प्रकाश, हरिप्रसाद काळे तसेच विद्यार्थी व पालक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.