चिमूर – व्हॉईस ऑफ मीडियाचे विदर्भ विभाग अधिवेशन रविवार, 16 एप्रिल रोजी किंग्जवे ऑडिटोरिअम (परवाना भवन) कस्तुरचंद पार्कजवळ नागपूर येथे पार पडले. यावेळी सामाजिक युवा नेते दिवाकर निकुरे यांचा सत्कार करण्यात आला.
व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने नागपूरात आयोजित विदर्भ विभाग अधिवेशनात दिवाकर निकुरे यांचा सत्कार करताना व्हॉइस ऑफ मीडियाचे केंद्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे, शेतकरी नेते रविकांत तुपकर, व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के, आरोग्य सेवा समन्वयक भीमेश मुतुल्ला, साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, राष्ट्रीय सरचिटणीस दिव्या भोसले, विदर्भ विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक,जेष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे, सुनिल कुहीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने आयोजित अधिवेशनात विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातून सदस्य सहभागी झाले होते. यावेळी सर्व जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने नागपुरात आयोजित विभागीय अधिवेशनात विदर्भभरातून सहभागी झालेल्या पत्रकार, सदस्य, केंद्रीय पदाधिकाऱ्यांना शपथ देण्यात आली. ही शपथ देताना ज्येष्ठ संपादक श्रीकृष्ण चांडक, ख्यातनाम कवी लोकनाथ यशवंत, ज्येष्ठ पत्रकार रामभाऊजी नागपुरे उपस्थित होते.