इस्लामपूर (प्रतिनिधी-इकबाल पीरज़ादे)
इस्लामपूर- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशातील कोट्यवधी दलित,पद दलितांना माणुसकीचा हक्क मिळवून दिला आहे. तसेच आपल्या देशाच्या जडणघडणीत आणि हा देश अखंड ठेवण्यात त्यांनी मोलाचे योगदान केले आहे, असे गौरवोद्गार राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील यांनी केले.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी ते बोलत होते. शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, संचालक शैलेश पाटील, राजकुमार कांबळे, हणमंत माळी प्रामुख्याने उपस्थित होते.विठ्ठल पाटील म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला जगातील एक आदर्श राज्य घटना दिली असून आपल्या देशातील लोकशाही अबाधित राखण्यात आपल्या राज्य घटनेचे योगदान मोलाचे आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शेती शेतकरी, जलसिंचन, महिला व कामगारांचे अधिकार आदीबाबत केलेल्या कामावर अधिक प्रकाश टाकायला हवा. यावेळी संचालक शैलेश पाटील, राजकुमार कांबळे, हणमंत माळी यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी विजय मोरे,सुनिल सावंत, प्रशांत पाटील,प्रेमनाथ कमलाकर, महेश पाटील, संजय गुरव, डी. एम. पाटील,विश्वनाथ पाटसुते, राजेंद्र पाटील,,संदीप घनवट यांच्यासह अधिकारी व कामगार उपस्थित होते.