Home क्राईम खबर  शेतीच्या जुन्या वादातून 30 वर्षीय युवकाची धारदार चाकू पोटात खुपसून निर्घृण हत्या

शेतीच्या जुन्या वादातून 30 वर्षीय युवकाची धारदार चाकू पोटात खुपसून निर्घृण हत्या

92

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड:- (दि.16 एप्रिल) शेतीच्या जुन्या वादातून एका 25 वर्षीय युवकाने 30 वर्षीय युवकाची धारदार चाकू पोटात खुपसून निर्घृण हत्या केली.

ही घटना रविवारी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास तालुक्यातील दराटी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अमडापूर येथील बसस्थांब्यावर घडली.

प्रकाश परशराम राठोड (30) रा. चिल्ली (इ.) ता. महागाव असे मृत युवकाचे नाव आहे.

कुंडलिक जांबवंत राठोड (25) रा. भोजनगर तांडा ता. उमरखेड असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. मागील काही वर्षांपासून अमडापूर परिसरातील शेतीवरून मृत प्रकाश आणि कुंडलिक यांच्यात वाद सुरू होता.

शेती कुंडलिक याच्या ताब्यात आहे. रविवारी दुपारी मृत प्रकाशसोबत अंदाजे 5 ते 6 जण त्या शेतीचा ताबा सोडून देण्याचे सांगण्यासाठी कुंडलिकच्या दुकानात गेले होते.

दुकानात शेतीवरून त्यांच्यात वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. कुंडलिकने धारदार चाकू प्रकाशच्या पोटात खुपसला. यात तो गंभीर जखमी झाला.

प्रकाशला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिस पाटील यांनी दराटी पोलिसांना दिली.

ठाणेदार भरत चपाईतकर यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आरोपीचा शोध घेत त्यास अटक केली.

यात आणखी काही आरोपी आहेत की नाही, हे अद्याप निष्पन्न झाले नसल्याचे ठाणेदार चपाईतकर यांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here