✒️सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि.14 एप्रिल) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उमरखेड तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भव्य मोटर सायकल अभिवादन रॅलीचे आयोजन केले होते.
या रॅलीचे उद्घाटक दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना), सुभाषराव दिवेकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई), ॲड. संतोषजी जैन, सुधाकरराव लोमटे सर (सामाजिक कार्यकर्ते) तर ठाणेदार अमोल माळवे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर रॅली छत्रपती शिवाजी चौक खडकपुरा, स्वामीचा, सोनार लाईन, चौभरा, मौलाली चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथे जाऊन तिथे पंचशील ध्वज ध्वजारोहण करून उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला.
सदर रॅली नाग चौक मार्गे गायत्री चौक, पुसद रोड तहसील मार्गे बोरबन येथील बुद्ध विहाराला भेट देऊन सदर रॅली महागाव रोड वरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अतिशय शांत पद्धतीने व उत्साहामध्ये संपन्न झाली.
या रॅलीचे मुख्य आयोजक सिद्धार्थ दिवेकर पत्रकार, प्रफुल दिवेकर अध्यक्ष उत्सव समिती, श्याम धुळे, कुमार केंद्रेकर,कैलास कदम, संतोष जोगदंडे, शाहरुख पठाण, शुद्धोधन दिवेकर, देवानंद पाईकराव विनोद बरडे, बबलू भालेराव ॲड. पंजाबराव नवसागरे असे अनेक कार्यकर्त्यांनी केले होते.
“भव्य मोटरसायकल रॅली चे सर्व समाजाकडून कौतुक”
यावेळी शेकडो मोटरसायकलस्वारांनी या रॅलीमध्ये सहभाग घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.