बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे,9075913114
गेवराई पंचायत समिती सध्या घरकुल योजना मंजूर व त्यांचे चेकद्वारे पेमेंट काढण्यासाठी संपूर्ण बीड जिल्ह्यात आता परिचित होत आसल्याचे दिसुन येत आहे.घरकुलचा पहिला व दुसरा हाफ्ता शासनाकडून आला की येथील कर्मचारी लाभार्थ्यांकडून दोन ते तीन हजार रुपये रोख स्वरूपात घेतल्या शिवाय चेक अथवा खात्यावर रक्कम टाकण्यासाठी पुढील हालचाली करत नसल्याचे दिसून येत आहे.अशाच प्रकरणात चार हजार रुपायाची लाच घेताना एक महाशय रंगेहाथ पकडले गेले.तरिही देखील येथील आधिकारी व कर्मचारी कसलेच भान न ठेवता घरकुल योजनेत चेक आलेल्या लाभार्थ्यांकडून खुलेआम सर्रास पंचायत समिती कार्यालयातच पैशाची मागणी करत आसल्याने लाभार्थी जाम वैतागले असुन या गंभीर बाबीकडे येथील व बीडचे वरिष्ठ आधिकारी देखील दुर्लक्ष करत आसल्याने या लोकांना खुलेआम पैसे खाण्यासाठी रान मोकळे शासनाने करुन दिले की ? अशा संतप्त प्रतिक्रिया लाभार्थ्यांकडून येऊ लागल्या आहेत.दरम्यान या पंचायत समितीत प्रत्येक योजना मंजूर व त्याचे बिले काढण्यासाठी हजारो रुपये कर्मचारी व आधिकारी यांना मोजावे लागत आसल्याने राज्य शासन गोरगरीबासाठी योजना मंजूर करतात आणि याचा सर्वाधिक लाखो रुपायांचा फायदा अशा मुजोर लोकांना होत आसल्याने अशा योजना आमच्या काय कामाच्या असा प्रश्न उपस्थित होत आहे.दरम्यान गेवराई पंचायत समितीतील पैसे खाण्यासाठी खुलेआम सर्रास अशी टोळी निर्माण झाली असुन बीडच्या वरिष्ठांनी अशा टोळीचा व समितीतील आधिकारी व कर्मचारी यांचा पर्दाफाश करावा अशी मागणी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांकडून आता होऊ लागली आहे.दरम्यान गेवराई पंचायत समितीत घरकुल योजनेत चाललेल्या भ्रष्टाचार तत्काळ वरिष्ठांनी थांबवून येथील या योजनेची जातीने चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी नसता १ मे महाराष्ट्र दिनी गेवराई पंचायत समिती समोर तिव्र अंदोलन छेडण्यात येईल असा खणखणीत इशारा रयत शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर यांनी दिला असुन लाभार्थ्यांकडून घरकुल योजनेतील बीले काढण्यासाठी लाच मागणा-या आधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याची मोहीम गेवराई पंचायत समितीत सोमवारपासून राबविण्यात येणार आसल्याचे देखील सुनिल ठोसर यांनी यावेळेस सांगितले.