Home महाराष्ट्र पत्रकारांना आत्मनिर्भर करण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे काम – राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी...

पत्रकारांना आत्मनिर्भर करण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे काम – राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी गेवराईत व्हॉईस ऑफ मीडियाची बैठक संपन्न

82

 

बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे,9075913114

व्हॉइस ऑफ मीडिया’ पत्रकार व पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी लढा देणारी संघटना आज देशपातळीवर २८ राज्यांमध्ये २६ हजार सभासद संख्या घेऊन अवघ्या दोन वर्षांत ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ने देशात नंबर एकची पत्रकार संघटना म्हणून स्थान मिळवले आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या संघटनेत पत्रकारांच्या हितासाठी असणारी पंचसूत्री हेच संघटनेचे एकमेव ब्रीद आहे. लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा हे ब्रिद वाक्य घेवून पत्रकारांसाठी ही राज्यव्यापी संघटना काम करत आहे. तर पत्रकारांना आत्मनिर्भर करण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे काम आहे असे प्रतिपादन व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी यांनी व्यक्त केले.
पत्रकारितेच्या इतिहासातील “व्हॉईस ऑफ मीडिया ” चे अभूतपूर्व राज्यस्तरीय अधिवेशन दि. 30 एप्रिल 2023 रोजी बीड येथे होत आहे.लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा हे सकारात्मक पत्रकारितेची बिजे रोवण्यासाठी या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात गेवराई तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना निमंत्रित करण्यासाठी रविवार दि.१६ एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष श्री संजय मालाणी, व्हॉइस ऑफ मीडियाचे नवनिर्वाचित मराठवाडा कार्याध्यक्ष जालिंदर धांडे यांची विशेष उपस्थिती होती. तर यावेळी जिल्हाउपाध्यक्ष भागवत जाधव, तालुकाध्यक्ष विनोद पौळ,विनोद नरसाळे, सुनील मुंडे,कार्याध्यक्ष राजेश राजगुरु, वैजीनाथ जाधव, मंगेश चोरमले, विष्णू गायकवाड, धनंजय जोगाडे, कामराज चाळक , शेख अतिख , तुकाराम धस ,विनायक उबाळे, सचिन डोंगरे,आसेफ शेख, अशोक सुरासे, त्रिंबक कोकाट, भागवत ढोरमारे, सतिश वाघमारे, यासीन शेख यांच्या सह गेवराई तालुक्यातील पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित निवडीबद्दल मराठवाडा कार्याध्यक्ष जालिंदर धांडे, जिल्हाउपाध्यक्ष भागवत जाधव, तालुकाध्यक्ष विनोद पौळ यांचा पत्रकार बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागवत जाधव यांनी सुत्रसंचालन विनोद पौळ तर आभार विनायक उबाळे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here