Home बीड डोईफडवाडी येथील शेतकऱ्यानी वीज बिल भरूनही वीज जोडण्यास लाइनमनचा नकार

डोईफडवाडी येथील शेतकऱ्यानी वीज बिल भरूनही वीज जोडण्यास लाइनमनचा नकार

66

 

  1. बीड जिल्हा प्रतिनिधी- (✒️नवनाथ आडे,9075913114)
  2.  (दि.७ एप्रिल):-गेवराई तालुक्यातील डोईफरवाडी येथील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन वीज बिल न भरल्यामुळे कट केले होते. त्यामुळे शेतातील पिकांना पाणी देता येत नव्हते पाण्यावाचून पिके जळून चालली होती त्यामुळे डोईफरवाडीतील शेतकऱ्यांनी दि.31 मार्च 2023 रोजी शेतकऱ्यानी थकीत कृषी पंपाचे वीज बिल भरले आणि डोईफरवाडीला असलेले लाइनमन पवार यांना शेतकऱ्यांनी फोन करुन सांगितलं की आम्ही वीज बिल भरले आहे साहेब आमचे वीज कनेक्शन जोडून द्या परंतु या लाइनमनने कनेक्शन जोडले नाही.तसेच या लाइनमची तोंडी तक्रार शेतकऱ्यानी व गावचे उपसरपंच यांनी महावितरनच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे बिले भरण्याच्या अगोदर केली होती.
  3. तसेच अनेक शेकऱ्यांचे पिकांचे नुकसान पाण्याआभावी होत असल्यामुळे डोईफरवाडीतील एका शेतकऱ्याने लाइनमन पवार यांना फोन लाऊन सांगितलं की साहेब आम्ही वीज बिले भरली आहेत आपण वीज जोडून द्या आमचे पिके जळत आहेत उसाला पाणी देयचे आहे, पिकांना पाणी देयचे आहे,वीज बिल भरलेली पावती तुम्हाला टाकतो, इंजिनिअर साहेब चार ते पाच दिवस झाले सुट्टीवर आहेत तसेच आमचे फोन घेत नाहीत आणि आमचे पिके जळून गेली तर कोण जिम्मेदार राहील असे सांगितले परंतु पवार यांनी शेतकऱयालाच फोन वर उद्धट भाषा वापरली की तुम्ही तर माजी तक्रार देता, रेकॉर्डिंग करता, तुमच्या पिकांना पाणी देयचं तर मी काय करू, मला अजिबात फोन लावायचा नाही,माज्या हातात काही नाही मी कनेक्शन जोडू शकत नाही तुम्ही साहेबाला भेटा, साहेब मला सांगतील तेव्हा वीज जोडून देईल आणि फोन कट केला.
  4. त्यामुळे अश्या मुजोर आणि शेतकऱ्यांना उद्धट भाषा वापरणाऱ्या लाइनमन वर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी डोईफरवाडीतील शेतकऱ्यांनमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here