🔹मुख्याध्यापक एस. डी. मेश्राम सर तसेच सहाय्यक शिक्षक वाय. एस. नहामुर्ते सेवानिवृत्त
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.3 एप्रिल):- दि 31 मार्च 2023 ला विकास शिक्षण संस्था अर्हेरनवरगाव द्वारा संचालित विकास विद्यालय अर्हेरनवरगाव मुख्याध्यापक एस. डी. मेश्राम सर तसेच सहाय्यक शिक्षक वाय. एस. नहामुर्ते सर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने त्याच्या निरोप व सत्कार समारंभाचा कार्यक्रम विकास विद्यालय अर्हेरनवरगाव येथे आयोजित करण्यात आला.
ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास शिक्षण संस्था अर्हेरनवरगावचे मा उपाध्यक्ष एन. डी. ठेंगरे साहेब, तर विशेष अतिथी म्हणून सतिश ठेंगरे सचिव विकास शिक्षण संस्था अर्हेरनवरगाव हे होते.याप्रसंगी सत्कारमुर्ती एस. डी. मेश्राम सर व सौ. नालिंदा मेश्राम , तसेच वाय. एस. नहामुर्ते सर व सौ. भारती नहामुर्ते ह्या दोन्ही दाम्पत्याचा शाल व श्रीफळ वस्त्र तसेच भेटवस्तू देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच विशेष अतिथी ना दोन्ही सत्कारमुर्ती बद्दल गौरवोद्गार काढून त्याचा भावी आयुष्यासाठी मणपूर्वक शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. बी. धोटे सर यांनी केले तसेच के. जी. घरत सर, व्ही. एम. धोटे मँडम यांनी मनोगत व्यक्त केले दोन्ही सत्कारमुर्तीनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त करुन सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षिका याचे आभार मानले कार्यक्रमाचे संचालन श्रीहरी ए. ठेंगरे सर यांनी केले तर आभार जी एम मेश्राम सर यांनी मानले
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.