🔹मांडवा येथील महिला उद्योग दुर्गाग्राम संघाचा स्तुत्यपूर्ण उपक्रम
✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.3एप्रिल):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद )तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती पुसद व प्रभागसंघ काकडदाती अंतर्गत येत असलेल्या उद्योग दुर्गा ग्रामसंघ समूहाने मानव विकास मिशन अंतर्गत मांडवा येथील शांतीधाममध्ये शेवग्याचे ८५ रोपटे व कडपत्याचे १५ रोपटे एकुण १०० रोपट्याचे काही महिन्यापुर्वी रोपण केले आहे.रोपण केल्यामुळे उद्योगास एक सहायता मिळेल व खडकाळ भागावर असलेल्या शांतीधामला हिरवाईचे स्वरूप येईल.व यापूर्वी लोकसहभागातून शांतीधाममध्ये २५० रोपट्यांचे रोपण केले आहे. या त्यांच्या रोपणामुळे याच्यात अधिक भर पडली आहे.
या झाडांचे संगोपन व संवर्धन वृक्षप्रेमी कैलास राठोड करीत आहेत .त्यांना एक सहायता म्हणून महिला उद्योग दुर्गा ग्रामसंघामध्ये एकुण ९ समुह आहेत. त्यांनी महिन्याच्या दर रविवारला शांतीधाममध्ये झाडाला आहळे करणे, गवत काढणे, खत टाकणे,पाणी देणे, स्वच्छता ठेवणे अशा प्रकारचे श्रमदान करण्याचा संकल्प केला आहे.
या कार्यास शिवजयंती दिनाचे औचित्य साधून सुरुवात केली. यासाठी लक्ष्मी समुह,समृद्धी समुह,सरस्वती समुह,प्रगती समुह,मिराबाई समुह,माताराणी समुह,नवक्रांती समुह,वैष्णवी समुह, कृष्णाई समुह उद्योग महिला समूहाचे पदाधिकारी, वृक्षप्रेमी कैलास राठोड, गजानन धाड,उंकडा मंदाडे, दुर्गा महिला उद्योग समूहाचे अध्यक्ष दुर्गा आबाळे, सचिव कविता धाड,आय.सी. आर.पी.जयश्री मंदाडे,दैवशाला डोळस तसेच समुहातील सर्व पदाधिकारी मंडळी व सदस्य मंडळी श्रमदान करित आहेत.तसेच दि.२ एप्रिल २०२३या रविवारी गावातील पोलीस पाटील दत्तराव पुलाते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शांती धाममधील प्रवेशद्वार ते दहनशेड पर्यंत दुतर्फा लावलेल्या झाडांभवतीचे तसेच परिसरातील गवत काढून श्रमदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला .यावेळी पोलीस पाटील दत्तराव पुलाते, वृक्षप्रेमी कैलास राठोड, ग्राम परिवर्तन समितीचे अध्यक्ष बजरंग पुलाते,शैलेश साखरे,बाळासाहेब ढोले तसेच इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.