✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.31मार्च):- शहरातील गजानन नगर येथील एका गोळ्या बिस्कीटाच्या दुकानात चक्क गुटखा व पानमसाला विक्री केला जात होता. याच दुकानावर छापा मारून तब्बल साडे दहा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक डॉ.धीरजकुमार यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ११ वाजता केली.
शहरातील गजानन नगर येथे असलेल्या ए वन नावाच्या गोळ्या बिस्कीटाच्या दुकानात फसियोद्दीन करीमोद्दीन अब्दुल (रा.गजानन नगर) हा गुटखा विक्री होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यावरून शुक्रवारी सकाळी ११ वाजता पथकाने दुकानावर छापा मारला. यावेळी विविध कंपन्यांचे गुटख्याचे पोते मिळुन आले. तसेच पोलिसांनी कारही (एम.एच १२ जी.झेड.१९५२) जप्त केली. फसियोद्दीन करिमोद्दीन अब्दुल याला अटक करण्यात आली असुन त्याने शेख जावेद ऊर्फ बब्बु शेख बशीर (रा. बीड) सचिन गुप्ता (रा.छत्रपती संभाजी नगर) यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले.
त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त करून सहायक पोलिस नरिीक्षक निलेश इधाटे यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलिस अधीक्षक डाॅ. धीरजकुमार, सहायक पोलिस निरीक्षक निलेश इधाटे, पोलीस कर्मचारी अशोक नामदास, गणेश नवले, युवराज चव्हाण, तुकाराम कानतोडे आदींनी केली.