Home नागपूर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सोहळा नागपूर येथे संपन्न

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सोहळा नागपूर येथे संपन्न

105

🔸नागपूर येथे विदर्भस्तरीय पुरस्काराचे वितरण

✒️नागपूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नागपूर(दि.30मार्च):-राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघा तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांचे हस्ते उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष गडचिरोली, ‘विदर्भ न्यूज इंडिया’, मीडिया वी.एन.आय चे संपादक, संचालक तथा विश्वगामी साप्ताहिक चे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी राजेशजी खोब्रागडे यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सोबतच ‘माय खबर २४’ चे संपादक, संस्थापक ,फाउंडर प्रीतम मडावी तसेच कृष्णाजी शेंडे यांनी मागील ५ वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत तसेच लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सतत परिश्रम घेतले, विविध कार्यक्रम घेऊन समाजात जनजागृती घडवण्याचे कार्य सुद्धा अगदी निस्वार्थ भावनेने केले. त्यांनी समाजात दिलेले योगदान मोलाचे आहे.

अगदी याच हेतूने की आज बेरोजगार युवक, युवतींना रोजगार मिळावा माय खबर २४ या प्लॅटफार्मची निर्मिती केली प्रितम मडावी, कृष्णा शेंडे यांना डिजिटल मीडिया उत्कृष्ट कामगिरी बद्दल पुरस्कार देण्यात आला त्यांच्या या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल, रविवार दि. २६ मार्च रोजी नागपूर येथील नंदनवन रेजेंटा सेंट्रल हॉटेल सभागृहात पुरस्कार सत्कार सोहळा पार पडला. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराने पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. राजेश खोब्रागडे हे गत चार वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ते विश्वगामी साप्ताहिक चे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी असून ‘विदर्भ न्यूज इंडिया’, ‘मीडिया वी.एन.आय’ चे संपादक, संचालक आहेत व गडचिरोलीतील नामांकित पत्रकार आहेत. निष्पक्ष निर्भीड व अभ्यासू पत्रकार अशी स्वातंत्र्य ओळख निर्माण केली असून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय, क्रीडा व कृषी साहित्य, धार्मिक, क्षेत्रात त्यांनी सातत्याने लिखाण केले व अनेक प्रकरणांना वाचा फोडली. त्यांचे पत्रकारितेतील कार्य प्रेरणादायी आहे.

समाजकार्यात सदैव तत्पर कोरोना काळात सुद्धा यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजामध्ये निर्भीड पत्रकारिता करून लोकांना जागृत केले, अशा त्यांच्या विविध समाजकार्य व पत्रकारिता क्षेत्रातील कार्य बघून त्यांचे लोकप्रतिनिधीनीच्या हस्ते सत्कार करण्यात आले होते. अल्पावधीतच तरुण पत्रकार म्हणून नावलौकिक मिळविले. कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या समस्येला लढा देण्यासाठी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदभार सांभाळत आहेत, त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघा तर्फे या वर्षीचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातून राजेश खोब्रागडे यांना जाहीर केला. सदर पुरस्काराने सन्मानित केल्याने राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार मित्रपरिवार, संपादक, व विविध स्तरातून तसेच मीडियामध्ये कार्यरत असलेल्या आदींकडून राजेशजी खोब्रागडे यांना अभिनंदन व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छाचां वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here