✒️चोपडा(पुरोगामी न्युज नेटवर्क)
चोपडा(दि.30मार्च):-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२९ मार्च २०२३ रोजी “BASIC SENSOR CIRCUITRY BUILDING POWER SUPPLY DESIGN HANDS ON TRAINING’ या विषयावर आधारित ‘एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विविध राज्यातील, महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातून तसेच क. ब.चौ. उमवि, जळगाव परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांमधून एकूण ११० विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला होता. या राष्ट्रीय कार्यशाळेचे प्रमुख वक्ते व ट्रेनिंग एक्स्पर्ट, इलेक्ट्रोसॉफ्ट इंस्टीट्यूट ऑफ मेक्याट्रॉनिक्स या कंपनीचे पदाधिकारी नीलेश शामकांत वाघ व राजेश भगवान ठाकरे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमास महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील यांनी या कार्यशाळेचे अध्यक्षपद भूषवले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी, उपप्राचार्य एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, विभाग प्रमुख डॉ.सौ.पी. एम. रावतोळे, डॉ.व्ही.आर.हुसे, डॉ. के.डी.गायकवाड, डॉ. एल.बी.पटले आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून या राष्ट्रीय कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ.सौ.पी.एम.रावतोळे यांनी केले तर प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ.एल.बी.पटले यांनी करून दिला.यावेळी राजेश भगवान ठाकरे यांनी ‘कार्यशाळेचे महत्व’ या विषयावर आपले विचार मांडले.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना उपप्राचार्य प्रा.डॉ. ए.एल.चौधरी यांनी ‘पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जावून अशा कार्यशाळेच्या माध्यमातून प्रात्यक्षिकावर भर देवून जास्तीत जास्त ज्ञान संपादन करावे’ असे नमूद केले. त्यानंतर महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव मा. ताईसाहेब डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यांनी भौतिकशास्त्र विभागाने या नावीन्यपूर्ण कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल कौतुक केले. भौतिक शास्त्र विभाग व इलेक्ट्रोसॉफ्ट इंस्टीट्यूट ऑफ मेक्याट्रॉनिक्स या कंपनीशी झालेल्या सामंज्यस्य कराराअंतर्गत विविध अशा उपक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांच्या विकासासाठी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली व ‘विद्यार्थ्यांना कुशल व्हा व रोजगारक्षम व्हा’ हा संदेश दिला.या उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. के. डी. गायकवाड यांनी केले व तर आभार डॉ. व्ही आर हुसे यांनी मानले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रमुख वक्ते व ट्रेनिंग एक्स्पर्ट नीलेश शामकांत वाघ व राजेश भगवान ठाकरे यांनी विद्यार्थ्याना या ट्रेनिंगसाठी लागणारे कॉम्पोनेंट व पॉवर सप्लाय डिझाईनचे सर्किट डायग्राम यासंबंधी सविस्तर माहिती दिली.यावेळी लॅबमध्ये विद्यार्थ्याना सर्व आवश्यक कॉम्पोनेंट चा वापर करून पॉवर सप्लाय त्यांच्याकडून तयार करून घेतले.
या कार्यशाळेच्या समारोप समारंभाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी होते.या कार्यक्रमात हिमेश निकम (सामनगाव, शासकीय तंत्रनिकेतन), कीर्ती पाटील, नीरज पोलूस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. डॉ. ए. एल चौधरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
या समारोप समारंभाचे सूत्रसंचालन डॉ.के.डी. गायकवाड यांनी केले तर आभार डॉ.व्ही. आर.हुसे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी डी. रजिस्ट्रार डी.एम.पाटील, सौ.के.एस.क्षीरसागर, डॉ.एम.एल.भुसारे, डी.एस.पाटील, सौ.सुनीता पाटील, भरत भालेराव, सुधाकर बावीस्कर व भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थी तसेच आयोजन समिती यांचे सहकार्य लाभले.
या राष्ट्रीय कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी गोपाल डी.वाघ, निरंजन एन. पाटील, जितेन धोबी, प्राजक्ता वानखेडे, जितेंद्र कोळी, नीलेश भाट, विजय शुक्ल व विशाल पाटील यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.