Home महाराष्ट्र जिप्सी चालक म्हणून जिप्सी मालकास प्राधान्य देऊ नका-मार्गदर्शक (गाईड) यांची निवेदनाद्वारे मागणी

जिप्सी चालक म्हणून जिप्सी मालकास प्राधान्य देऊ नका-मार्गदर्शक (गाईड) यांची निवेदनाद्वारे मागणी

149

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.30मार्च):-निसर्ग वनसंपदेच्या अनुभवा सोबत जंगालातील मुक्त संचार असलेल्या प्राणी पक्षी तसेच वनसंपदेची पाहणी करण्यासाठी रात्रीचे जंगल जवळून अनुभवता यावे, या साठी ताडोबा प्रशासनाने ताडोबा बफर झोन अंतर्गत येणाऱ्या पळसगांव वनपरिक्षेत्र मध्ये नाईट सफारीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

यात ताडोबा प्रशासनाने गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणला जंगल भ्रमंतीसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात गावातील नागरींकाना जिप्सी खरेदी, गाईड, जिप्सीचालक म्हणून प्राधान्य दिल्या गेले आहे.अनेक देशी विदेशी पर्यटक आपले बुकिंग करून जंगलात प्रवेश करतात, गावातील सामान्य नागरिकांना सुशिक्षित बेरोजगार यांना जंगल सफारीच्या माध्यमातून रोजगार मिळतो आहे.

नाईट सफारीमध्ये जिप्सी मालकास एका जंगल सफारी मागे २२०० रु किराया मिळत आहेत. यात किरायाने जिप्सी मालकास आर्थिक कसाबसा रोजगार मिळत आहे. मात्र गावातील बेरोजगार वाहन चालक मजुरी पासून वंचित आहे.

जर जिप्सी मालकास चालक म्हणून न ठेवता गावातील वाहन चालकास चालक म्हणून नियुक्ती केल्यास गावातील गरीब व गरजू व्यक्तीला रोजगार मिळेल या विचाराने गावातील नाईट सफारीवर कार्यरत असलेल्या जंगल मार्गदर्शक (गाईड) व निवडक जिप्सी मालकांनी बहुमताची भूमिका घेत पळसगांव वनपरिक्षेत्र अधिकारी यांना विनंती अर्ज सादर करून कार्यरत असलेल्या एका गाडी मालकास चालक पदावरुन कमी करून दुसऱ्या एखाद्या गावातील सुशिक्षित चालकास तरुणास चालक म्हणून नियुक्ती देण्यात यावी या करिता निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

जिप्सी चालक म्हणून गावातील तरुणास प्राधान्य दिल्यास गावातील बेरोजगार मुलांना रोजगार मिळेल, याचा विचार करीता वरिष्ठ वनाधिकारी यांनी तोडगा काढावा अशी मागणी गाईड मार्गदर्शक यांनी केली आहे.
—-
मार्गदर्शक (गाईड) यांचे निवेदन प्राप्त झाले आहे, वरिष्ठ कार्यलयात मार्गदर्शन मिळण्याकरिता सदर निवेदन पाठविण्यात आले आहे.
– योगिता आत्राम
वनपरिक्षेत्र अधिकारी पळसगांव(पि)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here