Home बीड जि.प.प्रा.शाळा,हिंगणी(बु.) शाळेत इयत्ता सातवी विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभ उत्साहात साजरा

जि.प.प्रा.शाळा,हिंगणी(बु.) शाळेत इयत्ता सातवी विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभ उत्साहात साजरा

126

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.30मार्च):-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,हिंगणी (बु )येथे ‘माझी शाळा माझे उपक्रम’ या उपक्रमांतर्गत इयत्ता सातवी विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभ बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला.निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेबापिंपरी केंद्राचे केंद्रप्रमुख मा.आबासाहेब हांगे सर,प्रमुख पाहुणे म्हणून जेबापिंपरी केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक मा.अंकुश निर्मळ सर, शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ पवार सर ,सहशिक्षक महेश फसले सर,सर्फराज सिद्धीकी सर,जितेंद्र औताने सर यांची उपस्थिती होती. शाळेतील इयत्ता सातवी च्या मुलांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत संपूर्ण दिवसभर शालेय अध्यापनाचे कामकाज पाहिले.इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी उत्तम प्रकारे अध्यापन केले.

शालेय विद्यार्थ्यांना स्वंयशिस्तिचे महत्व लक्षात यावे,एखादी जबाबदारी आपल्या स्वतःवर आल्यास ती आपण कशाप्रकारे पार पाडावी व भावी जबाबदार व सुजाण नागरीक घडविण्याच्या उद्देशाने स्वंयशासन दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

इयत्ता सातवी वर्गात शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांनी परिपाठासह अध्यापनाची जबाबदारी व शालेय कामकाज मोठया कौशल्याने पार पाडले. या एक दिवशी स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापिका कु.आरोही शिंदे तसेच इतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वर्गावर शिकविण्याचा अनुभव घेतला. निरोप समारंभ व स्वयंशासन दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जेबापिंपरी केंद्राचे केंद्रप्रमुख मा.आबासाहेब हांगे सर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेबापिंपरी केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक मा.अंकुश निर्मळ सर,मुख्याध्यापक मा.रघुनाथ पवार सर उपस्थित होते.

निरोप समारंभ कार्यक्रमात कु.दुर्गा घोंगडे,कु.सिद्धी कुलकर्णी ,कु.अक्षरा वायसे,कु. आरोही शिंदे ,कु.समीक्षा नाईकवाडे, कु.ऋतुजा धावडे, कु.अंकिता वायसे, कु.रोहिणी घोंगडे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.शाळेतील सहशिक्षक मा.महेश फसले सर, मा.सर्फराज सिद्धीकी सर,मा.जितेंद्र औताने सर यांनी निरोप समारंभ कार्यक्रमात मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रप्रमुख मा.आबासाहेब हांगे सर,प्रमुख पाहुणे केंद्रीय मुख्याध्यापक मा. अंकुश निर्मळ सर,मुख्याध्यापक मा.रघुनाथ पवार सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच ,निरोप समारंभ कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल शाळेचे अभिनंदन केले. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.

इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने इंग्रजी शब्दाची (शब्दकोश)डिक्शनरी भेट देण्यात आली.इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी संत रोहिदास महाराज ,छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर ,संत गाडगेबाबा, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, स्वामी रामानंद तीर्थ ,डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम या महापुरुषांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सहशिक्षक जितेंद्र औताने यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी सहशिक्षक सर्फराज सिद्धीकी सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था शाळेच्या वतीने करण्यात आली होती. शाळेतील सर्वच विद्यार्थांनी दिलेली जबाबदारी पार पाडल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.स्वंयशासन दिन व निरोप समारंभ कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ पवार सर, सहशिक्षक महेश फसले सर,सर्फराज सिद्धीकी सर,जितेंद्र औताने यांनी प्रयत्न केले तसेच शालेय पोषण शिजवून देणाऱ्या कर्मचारी कावेरीबाई राऊत, मीनाताई घोंगडे यांनी सहकार्य केले.भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here