Home महाराष्ट्र चोपडा महाविद्यालयात ‘स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय महिलांचे कार्यकर्तृत्व’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

चोपडा महाविद्यालयात ‘स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय महिलांचे कार्यकर्तृत्व’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

112

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि.29मार्च):- येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील महिलांचे कार्यकर्तृत्व’ या विषयावर आधारित चर्चासत्राचे आयोजन दि.३१ मार्च, २०२३ (शुक्रवार) रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड.संदीप सुरेश पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे उदघाटन शिरपूर येथील एस. पी. डी.एम.महाविद्यालयातील डॉ.मनीषा जे.वर्मा यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाप्रसंगी बीजभाषक म्हणून सेंधवा येथील शासकीय पदव्युत्तर महाविद्यालयाचे डॉ.के.आर.शर्मा उपस्थित राहतील.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या उपाध्यक्ष सौ.आशाताई विजय पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ.स्मिताताई संदीप पाटील आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या राष्ट्रीय चर्चासत्रात विविध या विषयांवरील शोधनिबंधांद्वारे चर्चा केली जाणार आहे. या चर्चासत्राच्या उदघाटन सत्रानंतर तीन सत्रात विविध महाविद्यालयांमधून सहभागी झालेले अभ्यासक व निबंधवाचक शोधनिबंधांचे सादरीकरण करणार आहेत. यात पहिल्या सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ. संजय जे. पाटील दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ. किशोर पाटील आणि तिसऱ्या सत्राचे अध्यक्ष म्हणून प्रा.श्रेया पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

या चर्चासत्रामध्ये देशभरातून तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव परिक्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयांमधील प्राध्यापक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे या चर्चासत्राचे प्रमुख संयोजक प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, उपप्राचार्य श्री. एन. एस. कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ. के.एन.सोनवणे, चर्चासत्राचे आयोजक व इतिहास विभाग प्रमुख सौ. सुनीता बी. पाटील, चर्चासत्राचे समन्वयक डॉ.एस.ए.वाघ तसेच श्री.डी. एस.पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here