Home महाराष्ट्र उमरखेड येथे सार्वजनिक श्रीरामजन्मोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

उमरखेड येथे सार्वजनिक श्रीरामजन्मोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

78

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 28मार्च):-येथील सार्वजनिक श्रीरामजन्मोत्सव समिती तर्फे गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत विविध सामाजिक ,धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी महिला मंडळ भजनीचे आयोजन करण्यात आले होते तर दि 24 मार्च रोजी बसवेश्वर संच यांचे भजन मंडळी, दि.25 मार्च रोजी संध्यानंद देवानंद पुजारी यांचे भजनी मंडळ व दि. 26 मार्च रोजी जय संतोषी माता भजनी मंडळ तसेच दि. 27 मार्च रोजी सत्यसाई भजनी मंडळ आणि दि. 28 मार्च रोजी महिला भजनी मंडळाचे कार्यक्रम तसेच 29 मार्च रोजी गीत रामायण कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहेत.

त्यासोबत दुपारी दोन ते पाच या दरम्यान दि. 27, 28 व 29 मार्च रोजी ह.भ.प श्री बापूराव तेरकर महाराज यांची रासकन्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाने श्रीरामजन्मोत्सव समिती 2023 च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सार्वजनिक श्रीरामजन्मोत्सव समिती 2023 यांच्या वतीने सर्व शहरातील व तालुक्यातील श्रीराम भक्तांना श्रीरामनवमी निमित्त दि 23 मार्च ते 29 मार्च पर्यंत विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात व गुरुवार दि 30 मार्च रोजी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी या कार्यक्रमास सर्व श्रीरामभक्तांनी उपस्थित राहण्याकरिता सार्वजनिक श्रीरामजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष ,सचिव व सर्व पदाधिकाऱ्यांनी आव्हान केले आहे. तसेच श्रीराम मंदिर स्टेट बँक कॉलनी उमरखेड येथून शोभायात्रा मिरवणूक काढण्यात येणार आहे.

मिरवणुकीमध्ये विविध मंडळे सामाजिक संघटना संस्था सहभागी घेऊन यंदाची श्रीरामनवमी जल्लोषात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विविध वाद्यासह व विविध पथके लेझीम, झांज पथक, भव्य दिव्य प्रभू श्रीरामाची मूर्ती आकर्षक ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here