🔸सिट्रस इस्टेट अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न !
🔹उमरखेड येथे शेकडो शेतकऱ्यांची प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थिती !
✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.28मार्च):-तालुक्यातील उमरखेड येथे सिट्रस इस्टेट अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांचा उद्घाटन कार्यक्रम आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते संपन्न झाला.महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रे मोठय़ा संख्येने असतानाही या फळांच्या शेती व्यवसायात आजही खूप अस्थिरता आहे. चांगले उत्पादन नाही, बाजारपेठ नाही, फळबागांच्या जमिनीची अवस्थाही खालावलेली आहे. या सर्व परिस्थतीवर मात करायची असेल, तर या संशोधन पद्धतीची दिशा बदलावी लागणार असल्याचे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.
सिट्रस इस्टेट ही संस्था एक कृषी संशोधन संस्था असून या संस्थे मार्फत लागवड क्षेत्रातील मातीचे नमुने तपासणी केली जाणार असून सोबतच कोणती कमतरता आहे हे सुध्दा सांगितले जाणार आहे या संस्थे मार्फत उच्च प्रतीच्या कलमा देखील उपलब्ध करून दिल्या जानार, रोपांपासून ते लागवडी पर्यंत मार्गदर्शन देखील सिट्रस इस्टेट करते. यामुळे उमरखेड येथील सिट्रस इस्टेटचा पुढाकाराने शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी निवारण करण्यास मदत मिळेल.
सिट्रस इस्टेट द्वारे केवळ उत्तम प्रतीच्या कलमा पुरवल्या आणि मार्गदर्शन केले जात नाही तर, लागवडी पासून विक्री पर्यंत शेतकऱ्यांना सिट्रस इस्टेट मदत करते. ग्रेडिंग आणि कोटिंग साठी सवलत ऊपलब्ध करून देते, येवढंच नाही तर बाजारपेठे बद्दल माहिती सुध्दा शेतकऱ्यांपर्यंत पोहचवली जाते. देशभरात संत्री विकण्यासाठी शेतकऱ्यांना वाहतूक सबसिडी सुध्दा ऊपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.
उमरखेड येथे सिट्रस इस्टेट अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण तंत्रज्ञान प्रात्यक्षिके उद्घाटन कार्यक्रम आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विभागीय कृषी संचालक किसनराव मुळे, प्रमुख उपस्थिती कार्यकारी समिती सदस्य श्रीधर ठाकरे, श्यामसुंदर ताथोडे, बाळू पाटील कोहळे, जिल्हा कृषी अधिकारी अनील खर्चान, प्रमुख मार्गदर्शक डॉ अतुल फुसे, क्रांती कुमार पाटील, सिट्रस इस्टेट मुख्य कार्यकारी अधिकारी शुद्धोधन वरघट, उप विभागीय अधिकारी राहुल सातपुते, तालुका कृषी अधिकारी साजना इंगळे, अतुल आगरकर, संत्रा उत्पादक शेतकरी रुपेश वाळके, राजेश्वर ठाकरे, रुपेश अंधारे, कृषी पर्यवेक्षक प्रवीण सातव, मोहन फुले, निलेश ठोके यांच्यासह मोर्शी वरूड तालुक्यातील शेकडो संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
सिट्रस इस्टेटसाठी तुकड्या तुकड्यात तुटपुंज्या निधीची तरतूद करून चालणार नाही तर सिट्रस इस्टेटची व्यवस्थित रचना करून त्यासाठी पुरेशा निधीची तरतूद करावी लागेल. तरतूद केलेला निधी वेळेत त्यांच्याकडे पोहोचवावा लागेल. एवढेच नाही तर त्या निधीतून संशोधनापासून ते निर्यात प्रक्रिया सुविधेपर्यंतची कामे होतील तेव्हाच नागपुरी संत्र्याची उत्पादकता वाढून संत्रा फळ जगभर पोहोचेल — आमदार देवेंद्र भुयार