✒️बीड जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.23मार्च);- तालुक्यात घरफोडीचे प्रमाण वाढले असून काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सावरगाव येथे धुमाकूळ घालत एक नव्हे दोन नव्हे तब्बल चार घरे फोडली. चारही घरातून सोन्याचांदीसह रोख असा दोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या घटनेने सावरगावसह परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संदिप वसंत वाघमारे, पांडुरंग कान्होबा मिसाळ, शरद नारायण लांडे व लक्ष्मण लहुजी मिसाळ यांची सावरगावात एकाच गल्लीत घरे आहेत. अज्ञात चोरट्यांनी काल (दि.२२) रात्री एक ते पाचच्या दरम्यान ही चारही बंद घरे फोडून घरातील रोख रक्कमसह दागिने असा एकूण दोन लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी संदिप वसंत वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.