✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.23मार्च):-माहिती व जनसंपर्क महासंचालनालय जिल्हा माहिती कार्यालय यवतमाळ द्वारा महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेचा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय संस्था नेताजी नगर यवतमाळ यांच्यावतीने पुसद तालुक्यातील पार्डी येथे शासनाच्या विविध योजनेची माहिती जनजागृती कलापथक कार्यक्रमातून देण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्डी ग्राम.पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विजय इसलकर हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून सरपंच जयश्री संदीप भोणे, उपसरपंच संगीता ज्ञानेश्वर राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस करण ढेकळे, व्हॉइस ऑफ मीडिया पुसद तालुका अध्यक्ष तथा दैनिक लोकमतचे प्रतिनिधी व ग्रामपंचायत सदस्य समाधान केवटे, ज्ञानेश्वर वाठ,अशोक गोरे,अरुण ढेकळे, रामेश्वर जाधव. राजू पुरी. व्हॉइस ऑफ मीडिया पुसद तालुका प्रसिद्धीप्रमुख पत्रकार अरुण बरडे हे उपस्थित होते.यावेळी जनजागृती कलापथकाच्या माध्यमातून गावातील महिला बचत गट शेतकरी व प्रतिष्ठित नागरिक यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती कलापथक संच प्रमुख गजानन वानखेडे, उषा गजानन वानखेडे, किशोर घोगंडे, दीपक डोंगरे,गीताई मेश्राम, रोहित वानखेडे, जनार्दन राठोड, दीपक राठोड, प्रशांत खोरगडे, गजानन जडेकर यांनी दिली.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सदस्य बाबाराव आंभोरे,सुनील राठोड, राजू मोरे, रामदास केवटे आशा गोरे,उषा जाधव, पूजा झरकर, शिलाबाई कांबळे, जाकीरा बी सजन,नंदू कांबळे, विठ्ठल जाधव,विक्की झरकर,समाधान शिनगारे, ओंकार पवार यांच्यासह गावातील शेतकरी बचत गट महिला बचत गटाच्या महिला व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने हजर होते