🔸समाजरत्न डॉ.बाबु जोगदंड पुन्हा सिध्द
✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)
बीड(दि.18मार्च):-गुरु महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गुरुदत्त कन्या प्रशाला चौसाळा स्थापना सन १९९० अध्यक्ष धनाजीराव थोरात यांच्याकडून नवनिर्वाचित अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते समाजरत्न डॉ. बाबुराव लक्ष्मण जोगदंड यांना आज रोजी शाळेचा हस्तांतरण व कारभार देण्यात आला. यावेळी चौसाळा व पंचक्रोशीतील अनेक पालकांची व कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
सदरील कार्यक्रमास शिवसेना बीड जिल्हा लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे,संस्थेचे माजी अध्यक्ष धनाजीराव थोरात,संस्थेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सयाजी(बप्पा) शिंदे,माजी वैधकिय अधिकारी अंकुश मंचुके साहेब,संस्थेचे ,संस्थेच्या नवनिर्वाचित सदस्य सौ.अमृता शिंदे,माजी सरपंच मधुकर तोडकर, श्रीमंत सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर,सावता परिषदचे बीड तालुका अध्यक्ष सुधीर चौधरी, माजी सरपंच विलास जोगदंड,सुमंतजी गुरव, हिंगणी चे माजी सरपंच उमेश आंधळे,मधुबप्पा शिंदे,मोहनराव झोडगे, राजेश नाईकवाडे,सिकुर सौदागर , शैलेश जोगदंड,संभाजी जोगदंड,पंजाब वाघमारे, गणेश काकडे यांच्यासह सर्वपक्षीय नेते व पंचक्रोशीतील नागरिक या सोहळ्यास मोठया संख्येने उपस्थित होते.
सर्वांच्या वतीने समाजरत्न डॉ.बाबु जोगदंड साहेब यांचा सत्कार करून संस्थेच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या..यावेळी गुरूदत्त शाळेचे मुख्याध्यापक साबणे मॅडम, शिक्षकवर्ग चौधरी सर,बाळासाहेब जाधव सर, घोडके सर,जाधव सर,मोटे सर,राठोड सर,केदार सर उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चौधरी सर यांनी केले.व आभार प्रदर्शन जाधव सर यांनी केले.