✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.18मार्च);-काल वडवणी तालुक्यातील विविध परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गारपीट होऊन शेती पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यामध्ये गहू ज्वारी हरभरा डाळिंब बागा आंबा या सविस्तर पिकाची खूप मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले असून तात्काळ या पिकाचे पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करावी असे मागणी धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी केले आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये असे म्हटले आहे की अगोदरच बळीराजा शेतातील कापसाला योग्य भाव मिळाला नसल्यामुळे कापूस विकलेला नाही त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असून त्यामुळे तात्काळ शेती पिकाचे झालेले नुकसान व त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करावी.
वडवणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून त्यामुळे शेतकऱ्याच्या अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेला गहू ज्वारी हरभरा डाळिंब या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर आज परिस्थिती पाहता शेतकरी खूप मोठे अडचणीचा सामना करत असून त्यांना तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करावी मागणी दिलेले प्रसिद्ध पत्रकामध्ये धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी केले आहे