Home बीड बीड हादरलं! पेप्सीचे आमिष दाखवून आठ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

बीड हादरलं! पेप्सीचे आमिष दाखवून आठ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

132

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.18मार्च):-अवघ्या आठ वर्षांच्या मुलीवर एका 40 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. पीडित चिमुरडीला आरोपीने पाच रुपयांच्या पेप्सीचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. बीड शहरातील पेठबीड भागात गुरुवारी दुपारी ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

दरम्यान मुलीचा शोध घेत असताना नराधम आरोपीच्या घराबाहेर चिमुकलीची चप्पल दिसून आल्यावर नागरिकांना संशय आला. त्यामुळे अखेर परिसरातील रहिवाश्यांनी आरोपीचे पत्रे काढून घरात प्रवेश केला आणि दुष्कृत्य करताना त्याला रंगेहात पकडला. याप्रकरणी पेठबीड पोलिस ठाण्यात पोक्सोसह इतर कलमांन्वये नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

गुरुवारी दुपारी बीड शहरातील पेठबीड भागात राहणारी एक आठ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. मुलगी तीन तास मुलगी बेपत्ता राहिल्याने आईसह परिसरातील नागरिकांनी तिचा शोध सुरु केला. दरम्यान परिसरातील एका व्यक्तीच्या घराबाहेर मुलीची चप्पल दिसून आली. घराचा दार बंद असल्याने नागरिकांना संशय आला. त्यामुळे नागरिकांनी घराचे पत्रे काढून घरात प्रवेश केला. नागरिकांनी घरात प्रवेश करताच त्यांना यावेळी हा नराधम दुष्कृत्य करताना दिसला. त्यामुळे त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here