✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी, म्हसवड)मो:-9975686100
म्हसवड(दि.17मार्च);- दहिवडी ता.माण येथील दहिवडी काॅलेजचा १२ वी कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे युवा व्याख्याते श्री.अभिजीत कोळी,अध्यक्ष डाॅ.एस.टी.साळुंखे,ज्यु.विभाग उपप्राचार्या सौ.नंदिनी साळुंखे,श्री.एम.एस.ढाणे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या पुजनाने झाली.त्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली व महाविद्यालयीन प्रवासातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाविद्यालयीन प्रशासन व शिक्षक यांनी अथक प्रयत्न करणे,सोशल मीडियाच्या माध्यामातून परीक्षेपुर्वी अध्यापन पुर्ण करणे अशा अनेक विषयांवर सतत मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी पारंपारीक वस्त्र परिधान करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.साळुंखे यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.१२ वी नंतरच्या वर्गाची माहिती देऊन महाविद्यालयात सुरू असलेल्या बी.काॅम,एम.काॅम,बी.ए,एम.ए,बॅंक मॅनेजमेंट तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
युवा व्याख्याते श्री.कोळी यांनीही विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,वाणिज्य शाखेच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन घेऊन आपण सी.ए. तसेच बॅंकेमध्ये नोकरी करून उदरनिर्वाह करू शकता.कला शाखेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन घेऊन उच्च पदस्थ अधिकारी होऊ शकता.आम्ही जरी आज कला,वाणिज्यचे विद्यार्थी असलो तरी भविष्यात काही तरी करून दाखवणार,काहीतरी घडणार म्हणून येथील शिक्षकांचा अट्टाहास असतो.त्या काॅलेजचे नाव ‘दहिवडी काॅलेज’असेही ते म्हणाले.त्यांनी पुढे ललिता बाबरचे उदाहरण देत आपण परिस्थितीतून मार्ग काढू शकतो हे सांगितले.१२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर आपला योग्य मार्ग निवडण्याचा सल्लाही त्यांनी दिला.मार्ग आणि मार्गदर्शक योग्य असेल तर कला व वाणिज्य शाखेतही करीअर होऊ शकते याची उदाहरणे त्यांनी स्पष्ट केली.
कला शाखेचे विभागप्रमुख सौ.एस.एम.पाटील,वाणिज्य शाखेचे विभागप्रमुख श्री.एम.एस.ढाणे,श्री.ए.एम.जाधव,निवेदक चंद्रकांत कोकाटे,पत्रकार धिरेनकुमार भोसले,उमेश बुधावले,प्रविण राजे,नवनाथ भिसे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.के.एस.पवार यांनी केले.तर श्री.एम.एस.ढाणे यांनी आभारप्रदर्शन करुन कार्यक्रमाची सांगता केली.