✒️मनोहर गोरगल्ले(पुणे,जिल्हा प्रतिनिधी)
पुणे(दि.16मार्च):-राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात सामाजिक कार्यकर्त्या सौ.मंगल शेवकरी यांची राज्य महासचिव पदी निवड करण्यात आली. नियुक्तीचे पत्र ओबीसी नेते आणि प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांचे हस्ते देण्यात आले.
या वेळी इतर मागास वर्ग कल्याण मंत्री ना.अतुल सावे, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवडे , प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रकाश भांगरथ, किसान महासंघाचे अध्यक्ष प्रकाश साबळे , आ.अभिजित वंजारी , माजी मंत्री परिणय फुके , विजय वडेट्टीवार , दादा चौधरी, आ.सुधाकर अडबाले ,आ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या सह राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.
निवडीनंतर केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना ओबीसी च्या शेवटच्या घटकाबरोबर पोहचविण्याचे काम करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यास मी कटिबध्द असल्याचे सौ.मंगल शेवकरी यांनी सांगितले.