🔸विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – डॉ.संजीवकुमार सोनवणे[ केंद्र संचालक ]
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)
धरणगांव(दि.16मार्च):- धरणगाव येथील दहावीचे परीक्षा केंद्र क्रमांक ३४१५ पी.आर.हायस्कूल येथील केंद्रावर सर्व शिक्षक बंधु – भगिनी, कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून दि. १५ मार्च, २०२३ बुधवार रोजी झालेल्या दहावीच्या गणित भाग -२ या पेपरला काळ्या फिती लावून काम केले.
यामध्ये केंद्र संचालक तथा शाळेचे मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे, सहायक केंद्र संचालक तथा उपमुख्याध्यापिका डॉ.आशा शिरसाठ, शिक्षक लोकशाही आघाडीचे तालुकाध्यक्ष डी.एस.पाटील, उपाध्यक्ष पी.डी. पाटील, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्रमुख जितेंद्र बोरसे, विजय दाभाडे तसेच महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक जे.एस.पवार, शिक्षक एस.व्ही.आढावे, एस.एन.कोळी, एस.के. बेलदार, सुर्यवंशी सर ,गुड शेफर्ड शाळेचे आदर्श शिक्षक लक्ष्मणराव पाटील आणि सर्व पर्यवेक्षकांनी पेपरच्या काळात काळ्या फिती लावून जुन्या पेन्शन योजनेला पाठीबा दर्शवला आहे.
महाराष्ट्र शासनाचे जुन्या पेन्शन योजनेबाबत लवकरात लवकर सकारात्मकता दर्शवावी,अशी मागणी संघटनेतर्फे महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी [ टी.डी.एफ. ] चे अध्यक्ष डी.एस.पाटील, उपाध्यक्ष पी.डी. पाटील यांनी केली.