✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
केज(दि.13मार्च):- तालुक्यातील रहिवाशी विष्णू कुंडलिक गदळे हे दहिफळ वडमाऊली ता. केज जिल्हा बीड येथील रहिवासी आहेत. मागील सन 1972 च्या महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळास खडीचे सालाचा दुष्काळ असे संबोधले जाते. त्यादरम्यान रोजगार हमी योजने मार्फत खडी फोडणे, रस्ते बांधणे या कामासाठी आलेल्या लोकांची व त्यांच्या पाल्यांची विनामूल्य सेवा विष्णू कुंडलिक गदळे यांनी केलेली आहे. त्या दुष्काळात त्यावेळी लोकांना खाण्यासाठी अन्नधान्य नव्हते, हाताला कसलेही काम नव्हते, जनावरांसाठी चारा नव्हता. तत्कालीन पंतप्रधान मा. इंदिराजी गांधी यांनी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला लोकांना खडी फोडण्याचे काम, रस्ते बांधण्याचे काम सुरू केले.
लोकांच्या हाताला काम मिळाले, त्या काळात मॅट्रिक पास असलेला तरुण विष्णू कुंडलिक गदळे लोकांची सेवा करण्यासाठी पुढे सरसावले, लोक खडी फोडत असत त्यांना त्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी नेऊन देणे. शासनाने जनतेला खाण्यासाठी मोफत सुकडी वाटप केली. ती सुकडी जनतेपर्यंत पोहच करण्यासाठी विष्णू गदळे यांनी मदत केली. लोकांच्या अडीअडचणी सोडवू लागले. खडी फोडणाऱ्यांच्या लहान मुलांना शेतात सावली सावली करून देणे. कोणी आजारी पडले तर त्यास दवाखान्यात घेऊन जाणे. त्यावेळी विष्णू म्हणजे जनतेसाठी देवदूतच होता. ही सर्व कामे विना मोबदला करत होते. त्यांचाच जनसेवेचा वारसा पुढे घेऊन आज त्यांचा मुलगा श्रीकांत विष्णू गदळे हा गेल्या दहा-बारा वर्षांपासून जनतेची सेवा करण्याचा वारसा पुढे चालवत आहे.
उदा. अल्पभूधारक शेतकरी, सामान्य शेतकरी, गोरगरीब कामगारांचे वयोवृद्धांचे, राज्यातील वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार दरबारी पत्राद्वारे मागणी करून प्रश्न सोडविण्यास ते मदत करीत आहेत. तरी त्यांना यापुढे भरीव काम करण्यासाठी श्रीकांत गदळे यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती करावी असे आपण राज्यपाल महाराष्ट्र शासन यांच्याकडे शिफारस करावी ही नम्र विनंती आहे. या अगोदर महाराष्ट्रा राज्याचे भूतपूर्व राज्यपाल यांना श्रीकांत गदळे यांनी स्टॅम्पपेपरवरती प्रतिज्ञापत्र देऊन राज्यपाल नियुक्त आमदार करण्याविषयी लिहिलेले आहे. त्यासाठी ते फक्त 1 (एक) रुपया प्रति महिना मानधन घेऊन (राज्याचा सन्मान म्हणून) घेऊन जनतेची सेवा करण्यास तयार असल्याचे निवेदन पत्र दिलेले आहे. आमदार यांना मिळणारे उर्वरित सर्व मानधन सरकारी ट्रेझरीमध्ये जमा करून शेतकरी गोरगरीब लोकांच्या कल्याणासाठी वापर करावा, कारण भरीव काम करण्यासाठी राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून श्रीकांत विष्णू गदळे यांना पद देऊन नियुक्ती करावी अशी आम्हा जनतेची मा. राष्ट्रपती महोदय साहेब भारत सरकार नवी दिल्ली यांच्याकडे निवेदनाद्वारे मा. जिल्हाधिकारी साहेब बीड यांच्या मार्फत मागणी केलीआहे.
यावेळी श्रीहरी शंकर ठोंबरे, अभिमान राधू राख, देविदास ठोंबरे, विठ्ठल सुखदेव ठोंबरे, अंबादास मोराळे, प्रभाकर ठोंबरे, वासुदेव आंधळे, बाजीराव मोरे, नवनाथ ठोंबरे, रघुनाथ ठोंबरे, शेख हसन, वंचाबाई तुकाराम ठोंबरे, पुष्पा ठोंबरे, मधुकर सोपान मोराळे, चंद्रभुज सोपान भोसले, बलभीम ठोंबरे, बन्सी ठोंबरे, शिवाजी मोरे, अशोक श्रीराम देशमुख, भिमाबाई भोसले, नामदेव आंधळे, देवराव गदळे, बासीर पठाण, बाजीराव मोरे, लोणचना भोसले, आणा लक्ष्मण मुंडे, भिमाबाई गोरख भोसले, बन्सी ठोंबरे यावेळी आदी उपस्थित होते.