✒️पाटण(पुरोगामी न्युज नेटवर्क)
पाटण(दि.9मार्च):- ता. शिंदखेडा दि. 8 मार्च 2023 रोजी लुपिन फाऊंडेशन धुळे, मार्फत बेटर कॉटन प्रकल्पांतर्गत शिंदखेडा येथील पाटण गावातील शेतकरी महिला शेतमजूर तसेच किशोवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा माता यांच्या साठी स्त्री-रोग चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते, तरी शिबिरात एकूण 191 महिलांनी लाभ घेतला.
लुपिन ह्युमन वेलफेअर आणि रिसर्च फाऊंडेशन धुळे मार्फत राबविल्या जाणाऱ्या बेटर कॉटन प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक श्री. सुनिल सैंदाणे साहेब, श्री. चंदन टोक्षा वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, श्री. कुशावर्त पाटील प्रशिक्षण समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ठीक ठिकाणी गाव पातळीवर जागतिक महिला दिन सप्ताह निमित्त मोफत स्री-रोग चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
सदर पाटण गावातील आरोग्य शिबिरा साठी लुपिन फाउंडेशन मार्फत स्त्री-रोग तज्ञ डॉ. श्रीमती स्नेहल बेहेरे यांनी मोफत तपासणी व औषधी देऊन समुपदेशन केले. प्रमुख उपस्थिती सरपंच सौ. श्रीमती अर्चना पवार, शिंदखेडा पंचायत समिती सदस्य प्रा. श्री विशाल पवार, पि. यु. व्यवस्थापक श्री तुकाराम मासुळे, कृषि सहा. श्रीमती विद्या पाटील. बेटर कॉटन गटप्रमुख श्री प्रदीप पवार आदी उपस्थित होते, शिबीर यशस्वी होण्यासाठी कृषी मित्र हर्षा कापडणे, स्वाती पाटील राहुल माळी, विजय कोल्हे, हरिष बोरसे, मनोज ढोले, अभिषेक सांगळे, भूषण परदेशी, हेमंत पाटील, चंद्रकांत ढिवरे, साईराज पाटील, अनिल तिरमल, ललित कोळपकर तसेच गावातील अंगणवाडी सेविका आशा सेविका आदींनी परिश्रम घेतले.