✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
खामगांव(दि.9मार्च):-येथील गौ-सेवक व रुग्णसेवक एकनिष्ठा जनसेवा फाउंडेशन संस्थापक रुग्ण हक्क संरक्षण समिती बुलढाणा जिला संघटक तसेच महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना बुलढाणा जिला अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांच्या गौ-सेवा रक्तसेवा आर्थिक मदत कार्याची दखल घेत श्रीमद भागवत कथा तोरणवाडा कथाव्यास श्री संजय महाराज इंगले व समस्त गांवकरी तोरणवाडा यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुरजभैय्या यादव यांना हारफूल माला घालून प्रमाणपत्र देऊन 2023 ने सम्मानित केले.
यावेळी हीवरा आश्रम शालेचे प्राध्यापक पंढरीनाथ शेलके सर, एकनिष्ठा फाउंडेशन जिला प्रसिद्धी प्रमुख सिद्धेश्वर निर्मल, योगेश राऊत, गोपाल ईटीवाले, विक्की इंगले व समस्त गांवकरी लोकांच्या उपस्थित सम्मान पार पडला•