🔸अध्यक्षपदी लक्ष्मण टारफे, तर सचिवपदी दिनेश खेकाळे
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.9मार्च):- येथे महात्मा मुंगसाजी विद्यालय,पुसद येथील सभागृहात संपुर्ण पुसद तालुक्यातील सर्व आदिवासी कर्मचारी बांधवांची सभा संपन्न झाली.या सभेचे अध्यक्ष म्हणुन डाॅ.हरिभाऊ फुपाटे हे होते.या सभेपुढील मुख्य विषय हा आदिवासी कर्मचारी संघटना,पुसद ची नविन कार्यकारिणी गठीत करणे हा होता.
सभेमध्ये अध्यक्ष पदासाठी दोन इच्छुक उमेदवार उभे राहल्याने सर्व कर्मचारी बांधवांमध्ये पेच निर्माण झाला.पण यावर लोकशाही मार्गाने गुप्त मतदान घ्यायचे सर्व उपस्थित कर्मचारी बांधवांच्या सुचनेवरुन ठरले.निर्णय अधिकारी म्हणुन केशव मस्के यांनी संपुर्ण सुत्रे हाती घेतले.अतिशय शांतपणे मतदान प्रक्रिया पार पडली.यामध्ये *लक्ष्मण टारफे* हे बहुमताने विजयी झाले.
अध्यक्ष म्हणुन सर्वाच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजवुन व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.नंतर सचिव म्हणुन दिनेश खेकाळे, उपाध्यक्ष पंजाब बेले, कोषाध्यक्ष राजेश घुक्से, तेजस्विनी इंगळे(कबले), सहसचिव गजानन बेले यांची सभेमध्ये सर्वांच्या समश्र व सहमतीने निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणुन कैलास बोंबले,नारायण सोनुळे, लक्ष्मण पांडे,काशिनाथ धुमाळे, सुखदेव फोपसे,देवराव मुरमुरे,रामप्रसाद उघडे,मधुकर वैद्य,संतोष डाखोरे,काशिनाथ खरवडे,उद्धव धोंगडे,विनोद मिराशे,संतोष तडसे या प्रमाणे निवड करण्यात आली.
सभेला डाॅ.हरिभाऊ फुपाटे,नारायण कर्हाळे,गंगाराम काळे,केशव मस्के,गणपत गव्हाळे,किरण मिराशे,राजेश ढगे,भास्कर मुकाडे,परमेश्वर मोरे,दादाराव चिरंगे,किसन भुरके ,मधुकर मोरझडे यांचे सह पुसदमधील सर्व कर्मचारी बांधव उपस्थित होते.सभेचे सुत्रसंचलन माजी सचिव संदेश पांडे यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश बोके यांनी मानले. सर्व कर्मचारी बांधवांनी अध्यक्ष व सचिव यांचे सह सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.