Home महाराष्ट्र रिल्स आणि इन्स्टापेक्षा सीमेवरचे जवान हेच रियल हिरो असतात – आ.डॉ.गुट्टे

रिल्स आणि इन्स्टापेक्षा सीमेवरचे जवान हेच रियल हिरो असतात – आ.डॉ.गुट्टे

66

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.5मार्च):-विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हातात आलेल्या मोबाईलच्या रिल्स व इनस्टा मधील तीस ते चाळीस सेकंदाच्या नायकांना हिरो समजणाऱ्या तरुण पिढीने सीमेवर चोवीस तास सेवा करणाऱ्या जवानांमध्ये रियल हिरो बघितला पाहिजे, असे स्पष्ट मत गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केले.
भारतीय लष्करात सतरा वर्षांच्या प्रदीर्घ देशसेवेनंतर सेवानिवृत झालेले जवान बंडू मारोतराव घोगरे (बेलवाडीकर) यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल सपत्नीक सन्मान गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, ऊन, वारा आणि पाऊस याची पर्वा न करता जवान डोळ्यांमध्ये तेल घालून एकनिष्ठेने दिवस-रात्र देशाची सेवा करतात. त्याच्या त्यागामुळे आपण सुरक्षित जीवन जगत असतो. वर्षातले सगळे सण व उत्सव आपण आपल्या परिवारात साजरे करतो. मात्र, जवान फक्त आठवणींच्या बळावर जगत असतात. त्यामुळे त्याच्या त्यागाचा, निष्ठेचा आणि देशसेवेचा सन्मान करणं समाज म्हणून आपले कर्तव्य आहे.

यावेळी माजी सैनिक संघटनेचे मार्गदर्शक अशोक आयनिले, जिल्हाध्यक्ष विश्वनाथ सातपुते, संघटक अर्जुन जाधव, सचिव माधव फड, श्रीहरी लटपटे, विलास गिते, पंडित सोनवणे, आकाश मुंढे, सखाराम गरुड, मारोती राठोड, भाऊसाहेब हाके, दिगंबर पवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here