Home महाराष्ट्र थांबलेले विकासचक्र शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा सुरु झाले – आमदार ससाने साहेब

थांबलेले विकासचक्र शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा सुरु झाले – आमदार ससाने साहेब

86

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.4 मार्च ):-महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्य पुर्ण योजने अंतर्गत उमरखेड शहरातील विविध प्रभागात 5 कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून सदर कामाचा लोकार्पण सोहळा तसेच 10 कोटी रुपयाच्या विविध लोकउपयोगी कामाचे भूमिपुजन सोहळा आज दि.3 मार्च 2023 रोजी म. बसवेश्वर मंदिर छत्रपती शिवाजी वार्ड येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नितीन भुतडा भाजपा जिल्हाध्यक्ष हे होते.तर उदघाटक म्हणून आ.नामदेवराव ससाने साहेब हे होते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व सामान्य जनता विकासापासून कोसो दुर राहिली.या सरकारने मतदार संघातील विकास कामासाठी एक रुपयाही निधी दिला नाही. हे सरकार पायऊतार झाले व महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्याने थांबलेले विकासचक्र पुन्हा सुरु झाले.मी मतदार संघातील विकास कामे खेचुन आणण्यासाठी सतत प्रयत्नात होतो.येणार्‍या काळात मतदार संघातील विकास कामे पूर्ण करण्याचा प्रमाणीक प्रयत्न करेल असे मत आमदार ससाने व्यक्त केले.

नितीन भुतडा म्हणाले आपल्या वार्डातील नागरीकांनी आ.ससाने साहेबांना आशीर्वाद दिले. छत्रपती शिवाजी वार्डातील विकास कामासाठी माजी शिक्षण सभापती प्रकाश दुधेवार सर हे नेहमी पाठपुरावा करतात.त्यांनी सुचविलेले कामे आम्ही दिली.म.बसवेश्वर मंदिर ते लिंगायत मोक्षधाम रस्ता, लेंडी नाल्यावरील पुलाचे बांधकाम, म.बसवेश्वर मंदिर ते बस्वलींग मठ (शिवाजी वाॅच) या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

पाच वर्षाच्या कार्यकाळात बसवेश्वर मंदिराचा 10 लाखाचा निधी थांबला.यामध्ये ‘अ’ ची अडचण आली.

लेंडी नाल्यावर पुर संरक्षण भिंत, वाचनालय, गार्डन ही कामे लवकरच हाती घेऊत ईसापूर पाईप लाईन योजना मंजुर झाली.

सदर योजनेतून 24 तास पाणी मिळणार आहे. पुढील 30 वर्ष पाणी टंचाई जानवणार नाही. अशी व्यवस्था करण्यात आली. आम्ही अतिशय सुंदर उद्याने उभी केली.

यवतमाळ जिल्ह्यात नाव निघावे असे संभाजी राजे उद्यान बनविले. शेतकर्‍यांना राष्ट्रीय महामार्गाचा मोबदला कमी मिळाला होता ? तो वाढवून दिला.

महामार्गाचे रखडलेले काम लवकरच पूर्ण होईल असा विश्वास नितीन भुतडा यांनी व्यक्त केला.

बाळू गिरी ते बिल्लावार दुकानापर्यंत सिमेंट नाली बांधकाम ,बाळू गिरी ते देविदास शहाणे यांचे घरापर्यत सिमेंट रस्ता, बिल्लावार यांचे घर ते मुनी वाड्यापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम पुर्ण झाल्याने सदर रोडचे लोकार्पण पार पडले.

या भूमिपूजन लोकार्पण सोहळ्यामध्ये दत्तदिगंबर वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष महेश भाऊ काळेश्वरकर, जिल्हा सचिव, अजयजी बेदरकर सर,डाॅ.जयशंकर जवने साहेब, राजेश दिघेवार, पत्रकार सिध्दार्थ दिवेकर,शैलेश दिघेवार,भगवान इंगळे, बाळू महाराज बन,भगवान महाजन, सुभाष कराळे,माधवराव बोनकुले, उत्तमराव मुंगे,शहर सरचिटणीस पुंडलीक भाऊ कुबडे, भगवान मडके, संदीप अण्णा भोकरे, बाळू गिरी, संतोष हिंगमीरे, विलास दुधेवार, सुनिल बिचेवार,कैलास दुधेवार, शिवा दुधेवार सर सह वार्डातील सर्वांनीच हजेरी लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here