तलवाडा येथे पाणीपुरवठा योजनेचा भव्य शुभारंभ
बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.2मार्च):-तलवाडाकरांची पाण्यासाठी होणारी वणवण कायमस्वरूपी थांबविण्यासाठी १४ कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. निवडणुकीत तलवाडाकरांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी कटीबद्ध असुन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात दर्जेदार विकास कामे होत आहेत. मागिल अनेक वर्षांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन अमरसिंह पंडित यांनी केले. तलवाडा येथे नळ पाणीपुरवठा योजनेसाठी पाण्याची टाकी आणि फिल्टर प्लांट कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
गेवराई तालुक्यातील मौजे तलवाडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत १४ कोटी ७ लक्ष ८१ हजार रुपये किंमतीच्या पाण्याची टाकी व फिल्टर प्लांटच्या कामाचा भूमिपूजन शुभारंभ माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाबासाहेब आठवले, डॉ.आसाराम मराठे, सरपंच मीनाताई हात्ते, विष्णू हत्ते, उपसरपंच आक्रम सौदागर, बाबाअप्पा शेटे, किनगावचे सरपंच पप्पू चाळक, मुनुबाई जवळाचे सरपंच दिगंबर खरात, गोविंदवाडीच्या सरपंच कल्पनाताई मराठे, नारायण मरकड, बळीराम शिंदे यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमरसिंह पंडित पुढे म्हणाले की, यापुढेही तलवाडा ग्रामपंचायतसाठी आपण भरपूर निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन देऊन कुठलेही काम मागे राहणार नाही. सर्व विकास कामात मी स्वतः लक्ष घालणार असून सर्वांनी एकत्रित येवून सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी सांगितले. पाणीपुरवठा योजना दर्जेदार करण्यासाठी ग्रामस्थांनी सजग राहून लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश महाराज कचरे यांनी केले. विठ्ठल चव्हाण, महेश मरकड मगन चव्हाण, भाष्कर गवते, गणपत नाटकर अभिजित थोरात, मोबीन खतीब, दादा रोकडे, किरण वावरे, बाबुराव कुलकर्णी, मुखीद भाई यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तलवाडा ग्रामस्थांनी योजेनेच्या कामाबाबत आनंद व्यक्त केला.