✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.1मार्च);- राज्यातील एकमेव असलेला गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर स्थित शासकीय हत्ती कॅम्प मधील एका हत्तीनीने नवीन पिलास जन्म घातले. मात्र काही क्षणातच पिलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली.
राज्यातील एक मात्र हत्ती कॅम्प असलेल्या कमलापूर येथील हत्ती गुजरात राज्यातील अदानीच्या खाजगी प्राणी संग्रहालय नेऊन जिल्ह्याचा वैभव संपण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात आला होता. मात्र गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आंदोलनानंतर आणि काही सामाजिक संस्थांच्या विरोधानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाने हत्तीच्या स्थलांतराला स्थगिती देण्यात आली. जिल्ह्यात सद्या आठच हत्ती शिल्लक असताना अशात नवीन जन्माला आलेल्या हत्तीच्या पिल्लाचे मृत्यू हे दुर्दैवी घटना असून, ही घटना पहिल्यांदाच घडते असे नाही मंगला नामक हत्तीनीच्या पोटी या अगोदरही चार हत्तीच्या पिल्लांनी जन्म घेतला व मृत्युमुखी पडले.
या सर्व प्रकरणात संबंधित वनप्रशासनाचे अधिकारी जबाबदार असून या हत्तीनीकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा व डॉक्टर उपलब्ध करून न दिल्याने आणि वन प्रशासनाच्या बेजबाबदारीपणामुळे त्या हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू झाला. या अगोदरच जिल्हा काँग्रेस च्या वतीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करून जिल्ह्यातील वनविभागाच्या विविध समस्यांची जाण करून दिली होती. मात्र अद्यापही वनमंत्र्याने त्या संदर्भात कोणतेही पाऊल उचल्याचे दिसत नाहीं. वनमंत्र्याच्या गृह जिल्ह्यालगत असेलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वनप्राण्यासंदर्भात निष्काळजी पणा केल्या जाते, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरजागड प्रकल्पाकरिता वृक्षतोड करण्यात येत आहे, अनेकांचा जीव घेणाऱ्या T6 वाघिणीला जेरबंद करण्यात वनप्रशासनाला अद्यापही यश आले नाहीं.
या सर्व अडचणीकडे वनप्रशासन लक्ष न देता अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा अनुभव नसतांना आर्थिक गैरव्यवहार करून त्यांच्या मार्फत बांधकामाचे कामे केल्या जातात व बिल काढल्या जातो. अधिकाऱ्यांना आर्थिक फायदा होत असल्याने संबंधित अधिकारी आपल्या मुख्य जबाबदारीपासून दूर होतात.
तरीही वनमंत्री गप्पच आहे. त्यामुळे अश्या गैरजबाबदार वनमंत्र्यांनी राजनीमा द्यावा व संबंधित सिरोंचा वनपरीक्षेत्राचे उपवन संरक्षक, मुख्य वन संरक्षक यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे व इतर हत्तींच्या सोयीसुविधा आणि जिल्ह्याचे वैभव आबादीत राखण्याकरिता या हत्तीकॅम्पचा विकास करून प्रत्येक हत्ती मागे स्वतंत्र चारा कटर, प्रशिक्षित माऊथ आणि उत्तम दर्जाची आरोग्य टीम उपलब्ध करून देण्यात यावे व वनखात्यामार्फत करण्यात येणारे बांधकाम काढण्यात यावे अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे. अन्यथा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोन करण्याचा इशाराही महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिला आहे.