Home बीड सावता परिषदेच्या अधिवेशनाला तालुक्यातून सावता सैनिक सह माळी समाज बांधव मोठ्या संख्येने...

सावता परिषदेच्या अधिवेशनाला तालुक्यातून सावता सैनिक सह माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार – दादासाहेब चौधरी

76

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.1मार्च):-“समाजकार्यासाठी समाज संघटन ” हे ब्रीदवाक्य घेऊन अल्पावधीतच सबंध महाराष्ट्रामध्ये माळी समाजाची सक्रिय संघटना असलेल्या सावता परिषदेचे पाचवे त्रैवार्षिक अधिवेशन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर येथे संपन्न होणार आहे या अधिवेशनाला गेवराई तालुक्यातून सावता परिषदेच्या पदाधिकाऱ्यासह माळी समाजास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सावता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष दादासाहेब चौधरी यांनी केले आहे.

सावता परिषदेच्या नियोजित धोरणानुसार संघटनेचे अधिवेशन दर तीन वर्षाला होत असते हे पाचवे अधिवेशन असून अहमदनगर शहरातील नंदनवन लॉन्स येथे शनिवारी 4 मार्च 2023 रोजी सकाळी 11:30 वाजता संपन्न होणार आहे माळी समाजाच्या प्रश्नावर मंथन करण्यासाठी व संघटनेच्या वतीने विविध ठराव पारित करण्यात येणार आहेत.

प्रमुख उपस्थिती म्हणून नगर शहराचे प्रथम महापौर भगवानराव फुल सौंदर, प्रथम नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत, माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर, शंकरराव बोरकर, छगनराव मेहत्रे , सभापती जगन पाटील काळे ,आजिनाथ हजारे ,लक्ष्मणराव ढवळे, रामजी पेरकर ,आदी उपस्थित राहणार असून तरी गेवराई तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह माळी समाज यांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गेवराई तालुका अध्यक्ष दादासाहेब चौधरी शहराध्यक्ष सदाभाऊ वादे व युवा आघाडी तालुकाध्यक्ष राधेश्यामजी लेंडाळ यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here