Home महाराष्ट्र पुस्तक समीक्षणात सुशील हिम्मतसिंगका विद्यालयाची कु.सानिका पातोंड प्रथम

पुस्तक समीक्षणात सुशील हिम्मतसिंगका विद्यालयाची कु.सानिका पातोंड प्रथम

128

✒️वर्धा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

वर्धा(दि.1मार्च):-वर्धा जिल्ह्यात शिक्षण विभागातर्फे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ दि.14 जानेवारी ते 28 जानेवारी या काळात साजरा करण्यात आला. या अंतर्गत झालेल्या विविध कार्यक्रमात ‘वाचलेल्या पुस्तकांचे समीक्षा लेखन’ ही स्पर्धा विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आली होती. या स्पर्धेत सुशील हिम्मतसिंगका विद्यालयाची वर्ग 10 ‘क’ ची विद्यार्थिनी कु.सानिका पातोंड हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
दि.27 फेब्रुवारीला सार्वजनिक वाचनालय येथे पार पडलेल्या ‘मराठी भाषा गौरव दिनाच्या’कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कु.सानिकाला सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

त्याबद्दल संस्था अध्यक्ष आ.गीता दिदी गुप्ता व संस्था मंत्री श्री.पवनजी रुईया, विद्यालयाच्या मुख्याध्यापक आ.पद्माताई तायडे यांनी सानिकाचे कौतुक केले.पर्यवेक्षक श्री. कोपुलवार सर,वर्गशिक्षिका ढेंगळे ताई, श्री.सुकळकर सर,श्री.मांडवकर सर,श्री.वैद्य सर, श्री.वाढीवे सर,श्री.साखरकर सर,पाटील ताई,केला ताई,वाजपेयी ताई, साबळे ताई, पोहरे ताई,कुकडे ताई,मार्गदर्शक श्री.चौधरी सर व पाखरे ताई आदि विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी तिचे मन:पूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here