🔹सिमेंट काँक्रिट नालीचे बांधकामासाठी २३ कोटी २७ लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान !
🔸वरूड तालुक्यातील २६ पूरग्रस्त गावातील नागरिकांनी मानले आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार !
✒️वरुड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
वरूड(दि.1मार्च):- तालुक्यात १९९१ मध्ये आलेल्या महापुरातील पूरग्रस्त गावातील नागरिकांच्या समस्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या समस्यांची दखल मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतल्यामुळे वरूड तालुक्यातील २६ पूरग्रस्त गावातील सिमेंट काँक्रिट नालीच्या बांधकामाकरीता २३ कोटी २७ लक्ष ८५ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे २६ पूरग्रस्त गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
वरुड तालुक्यातील सन १९९१ मध्ये आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या गावातील रस्ते व नाली बांधकामाकरीता ठोक तरतुदी अंतर्गत विशेष बाब म्हणून तत्काळ प्रस्ताव तयार करून त्यावर निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केल्यामुळे अजितदादा पवार यांनी ८ जुलै २०२० रोजी मदत पुनर्वसन विभागाला प्रस्ताव सदर करण्याचे निर्देश दिले.
आमदार देवेंद्र भुयार यांनी ५ मे २०२१ रोजी १९९१ च्या पुरामध्ये बाधित झालेल्या ३१ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तत्काळ निकाली काढण्यासाठी बैठक आयोजित करण्याची मागणी केली असता तत्कालीन मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली १४ जुलै २०२१ रोजी बैठक आयोजित करून सत्य शोधन समिती गठीत करण्यात आली तसेच महापुरामुळे बाधित झालेल्या गावांचे पुनर्वसन करून नागरी सुविधा निर्माण करण्याबाबत हिवाळी अधिवेशनामधे २४ डिसेंबर २०२१ रोजी तारांकित
प्रश्न मांडून पूरग्रस्त गावातील नागरी सुविधेची कामे मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी रेटून धरली. तसेच नागपूर खंड पिठामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी या संदर्भात याचिका सुद्धा दाखल केली होती.
वरुड तालुक्यातील पूरग्रस्त गावातील समस्या सोडवण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव नायक, उपायुक्त बावणे यांच्या उपस्थितीत पुनर्वसित गावातील नागरी सुविधा कामांची सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पूरग्रस्त गावांचा पाहणी दौरा करून गाव अंतर्गत रस्ते, नाली, अंगणवाडी, सार्वजनिक शौचालय, पान्याच्या टाक्या, वीज कनेक्शन, पेव्हर ब्लॉक, तार कुंपण, पाण्याच्या पूरक पाईप लाईन, हँडपम्प इ कामांची पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी विकास कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या होत्या.
आमदार देवेंद्र भुयार यांनी २८ गावातील नागरी सुविधेची कामे पूर्ण करण्यासाठी विभागीय आयुक्त यांचे मार्फत प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करून पूरग्रस्त २८ गावातील बांधकाम प्रस्तावास तात्काळ प्रशासकीय मान्यता प्रदान करुन कामे पुर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे केल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन सन १९९१ मध्ये महापुराने बाधित झालेल्या वरूड तालुक्यातील आमनेर, देऊतवाडा, वाघाळ, पोरगव्हाण, मोर्शी खुर्द, वेढापुर, उदापूर, घोराड, चींचरगव्हाण, मोरचुंद, वाडेगाव, गाडेगाव, वाठोडा, खानापूर, कुरळी, पवणी, सावंगी, वंडली, चांदस, लिंगा, सुरळी, मालखेड, अमडापुर, पुसला, शहापूर, गणेशपुर येथील सिमेंट काँक्रिट नालीचे बांधकाम करणेसाठी नागरी सुविधेच्या कामाकरीता २३ कोटी २७ लक्ष ८५ हजार ४४६ रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून वरुड तालुक्यातील २६ गावांच्या पूरग्रस्त वसाहतीमध्ये सिमेंट कॉक्रीट नालीचे बांधकाम होणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी दिली.