✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
यवतमाळ-पुसद(दि.1मार्च):-राज्यातील वंचित गरीब श्रमिक लोकांना स्वतःचे घर नसल्यामुळे व आर्थिक दुर्बलतेमुळे ती स्वतःचे घर बांधू शकत नाही परंतु महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील गरीब लोकांना शासनाकडून घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.
परंतु कागदपत्रे व फाईल जमा करण्यासाठी पंचायत समितीला खेटे मारावे लागतात मोलमजुरीचे कामे सोडून गावातील वृद्ध नागरिक व महिलांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते एवढे करून घरकुल नियमाच्या चौकटीमध्ये बांधल्याने लाभार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो.
परंतु गल्लीपासून दिल्लीपर्यंत हक्काचे घरकुल मिळण्यासाठी
गावातील निराधार व्यक्तीला अनंत अडचणीचा सामना केल्या शिवाय काहीच पर्याय नसतो निराधार असाह्य श्रमिक वंचित व्यक्तींचा आवाज भीम आर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांना माणिकडोह येथील घरकुल लाभार्थी यांनी भेटून आपल्या व्यथा सांगितल्या तोच प्रश्न घेऊन भीम आर्मीचे शिष्टमंडळ पुसद येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, संजय राठोड यांचे कार्यालयामध्ये घरकुल प्रश्नाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.
ही संपूर्ण चर्चा यशस्वी झाल्याने पुसद पंचायत समितीचे
कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी मंजूर झालेल्या घरकुलाचे अनुदान त्वरित लाभार्थ्याच्या खात्या मध्ये जमा करा असे सांगितले असता संपूर्ण घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम त्वरित खात्यात जमा झाली आहे.
अशाप्रकारे माणिकडोह येथील जवळपास 40 घरकुलांच्या लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झाल्याने सर्व लाभार्थी यांच्या घरकुल बांधण्याचा प्रश्न निकाली लागला आहे.
नागरिकांनी भीम आर्मी संघटनेच्या वतीने लाभार्थ्यांना। जे
आर्थिक साह्य मिळवून दिले त्याबद्दल समस्त घरकुल लाभार्थी यांनी भीम आर्मी संघटनेचे आभार व्यक्त केले.
“यापुढील काळात गावातील कोणत्याही समस्या असल्यास आपण भीम आर्मी संघटनेशी संपर्क साधावा आपल्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार झाल्यास् सर्वस्वी मदत केल्या जाईल असे आवाहन भीम आर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक निवृत्ती भालेराव यांनी केले भीम”.
यावेळी प्रामुख्याने भीम आर्मीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, राजेश ढोले,रिपब्लिकन वार्ता न्यूज मीडिया सेल प्रभारी, धनराज कांबळे भीम आर्मी यवतमाळ महासचिव, अजय लोखंडे पुसद तालुका उपाध्यक्ष ,अर्जुन लांडगे अमोल राठोड ,तथा भीम आर्मी शिष्ट मंडळ प्रामुख्याने उपस्थित होते.