Home चंद्रपूर अवघड क्षेत्र बदली टप्पा स्थगित करण्याची आमदार कपिल पाटील यांची मागणी

अवघड क्षेत्र बदली टप्पा स्थगित करण्याची आमदार कपिल पाटील यांची मागणी

330

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.26फेब्रुवारी):- शिक्षक बदली प्रक्रियेतील शेवटचा अवघड क्षेत्र बदली टप्पा स्थगित करण्याची मागणी आमदार कपिल पाटील यांनी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे.

मागील तीन महिन्यांपासून राज्यात प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेचे पाच टप्पे पूर्ण झाले असून शेवटचा टप्पा अवघड क्षेत्र बदलीचा आहे. शासनाने निर्धारित केलेल्या टीचर मॅनेजमेंट ट्रान्सफर सिस्टिममार्फत बदली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.या यादीत ५३ वर्षांवरील शिक्षक, महिला, विधवा शिक्षिका, गंभीर आजारी, दिव्यांग व सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांचा समावेश आहे.या शिक्षकांना हे त्रासदायक व अडचणीचे होत आहे.

वास्तविक पाहता शासनाच्या प्रचलित बदली धोरणानुसार अशा शिक्षकांना बदलीमध्ये सूट देण्यात आली आहे. अशा परिस्तिथीत शिक्षकांना अवघड क्षेत्रामध्ये बदली करणे हा त्यांचेवर अन्याय होणार आहे.अवघड क्षेत्रातील रिक्त जागा शिक्षक भरती प्रक्रियेमधून भरण्याची आवश्यकता असल्याचे आमदार कपिल पाटील यांनी प्रधान सचिव यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

सदर भरती प्रक्रियेतून दुर्धर आजारी, अपंग शिक्षक, विधवा महिला शिक्षिका आणि ज्येष्ठ शिक्षकांना वगळण्यात यावे तसेच शिक्षक भरती प्रक्रियेपर्यंत सहावा टप्पा स्थगित करण्यात यावा अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी केली आहे, अशी माहिती शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुरेश डांगे, जब्बार शेख, नंदकिशोर शेरकी, रावन शेरकुरे, राजाराम घोडके, वीरेनकुमार खोब्रागडे, डाकेश्वर कामडी, विलास फलके, कैलास बोरकर, राजेश घोडमारे, निर्मला सोनवणे आदींनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here