Home महाराष्ट्र म्हसवड फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष पदी अमित मुल्ला यांची निवड

म्हसवड फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष पदी अमित मुल्ला यांची निवड

98

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.26 फेब्रुवारी):- रोजी झालेल्या म्हसवड फोटोग्राफर असोसिएशनची निवडणूक संपन्न झाली यावेळी अध्यक्ष पदी अमित मुल्ला यांची तिसऱ्यांदा निवड झाली.म्हसवड फोटोग्राफर असोसिएशनची आज वार्षिक बैठक संपन्न झाली यामध्ये महत्वपूर्ण ठरावासह अध्यक्ष पदासाठीची निवडणूक घेणेत आली यावेळी मतदान पद्धतीने झालेल्या निवडणुकीत अमित मुल्ला हे निवडून आले आणि तिसऱ्यांदा अध्यक्ष पद भूष विण्याची संधी आज त्यांना सभासदांनी दिली.

यावेळी अध्यक्षांसह उपाध्यक्ष राजेंद्र काशिनाथ केवटे,सचिवपदी धनंजय पानसांडे,कोषाध्यक्ष म्हणून सचिन अंनंत सरतापे यांची निवड करणेत आली.निवडी नंतर बोलताना अमित मुल्ला म्हणाले यापुढे अध्यक्ष म्हणून असोसिएशन साठी जे काही करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार असून यापुढे म्हसवड शहरात फोटोफेआर भरविणार आहे ज्यामुळे फोटोग्राफर बांधवांना येणाऱ्या नवनवीन असेसरिज ची माहिती मिळणार आहे.

यासाठी सर्व फोटोग्राफरने बरोबर घेऊन सामाजिक कार्यक्रम सुधा राबविण्याचा यापुढे प्रयत्न असेल.यावेळी सचिन सोनवणे,राहुल खटावकर, दत्ता ढवळे,संभाजी झीमल,सुनील करपे,जितेंद्र गलांडे,गजकुमार ढोले,चंदू बनगर आदी फोटोग्राफर यांची उपस्थिती होती यावेळी सर्व नवीन पदाधिकारी यांचे अभिंनंदन करणेत आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here