सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड:) प्रतिनिधी)
उमरखेड(दि.26फेब्रुवारी):-खरेदी विक्रीसंघ निवडणूक प्रक्रिया 6 फेब्रुवारी सुरू झाली होती. संस्था आर्थिक दृष्ट्या बळकट नसल्याने सर्वच पक्षाच्या नेत्यांनी संस्था बिनविरोध निवड व्हावी या मताशी ठाम राहिले.
त्या दृष्टीने प्रत्येक पक्षगट नेत्याला समजूत घालून तेरा संचालकाची निवड केली. त्यामध्ये काँग्रेस पक्षाने सुधाकर लाहेवार माजी उपनगराध्यक्ष तथा माजी संचालक खरेदी विक्रीसंघ यांच्या सुविद्यपत्नी सुमनबाई सुधाकर लाहेवार यांची निवड केली.
या निवडीचे श्रेय नंदकिशोरभैया अग्रवाल उमरखेड शहराध्यक्ष व ज्येष्ठ नेत्यांना देण्यात येते. त्याबद्दल मित्र परिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.