✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.25फेब्रुवारी):-शहरात लॉजच्या नावाखाली खुलेआम सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पर्दाफाश केला आहे. शहरात एका लॉजवर धाड टाकून लॉज मालक, आंटीसह व्यवस्थापकाला ताब्यात घेतले असून औरंगाबाद येथील एका पीडितेची सुटका करण्यात आली आहे.
गेवराईतील एका लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या प्रमुख सुरेखा धस यांना मिळाली होती. त्यानंतर गेवराई ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मदतीने, डमी ग्राहक पाठवून छापा टाकला. यावेळी डमी ग्राहकाने दोन हजार रुपये देताच त्यास एका खोलीत पाठविले. तेथे पीडित 27 वर्षीय महिला होती. डमी ग्राहकाने इशारा करताच पथक धावत गेले.
यावेळी लॉजमालक सूरज निकम रा. निकम गल्ली, गेवराई, व्यवस्थापक राजेश चोरमले रा. रेवकी देवकी, ता. गेवराई व आंटी अरुणा राठोड रा. जयराम नाईक तांडा, हमु अहिल्यानगर, गेवराई या तिघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक 1965 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला