गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते, डॉ. नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेचे उद्घाटन
रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.25फेब्रुवारी):- जय शिवराय मंडळ विहीरगाव ता. जि. गडचिरोली च्या वतीने भव्य कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉक्टर नामदेव किरसान त्यांच्या हस्ते पार पडले.
तंत्रज्ञानाच्या युगात मातीशी नाळ असणारे कबड्डी खो-खो सारख्या विविध स्पर्धांचे आयोजन होणे ही काळाची गरज असून त्यामुळे उत्तम आरोग्य लाभते इतकेच नाही तर सध्या परिस्थितीत स्थानिक खेळांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा वाव मिळत असून त्या माध्यमातून युवकांना करिअरच्या संधी सुद्धा तयार करता येतात याचा युवकांनी पुरेपूर फायदा घ्यावा असे मत कार्यक्रमाचे उद्घाटक गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महिंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नामदेवराव किरसान यांनी सुद्धा युवकांना व सहभागी खेळाडू स्पर्धकांना मार्गदर्शन केले व होणाऱ्या स्पर्धांकरिता शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ. जा. काँग्रेस जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, तालुका काँग्रेस अध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष दिवाकरजी निसार, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष ढिवरुजी मेश्राम, युवक काँग्रेसचे नितेश राठोड, काँग्रेस नेते जितू पाटील मुनघाटे, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेशजी बांबोळे, माजी उपसरपंच भक्तदास नवघरे, जितुभाऊ टिकले, देवेंद्र भोयर, अमित चुधरी व प्रतिष्ठित नागरिक तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक आणि सहभागी खेळाडू उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप कोहळे यांनी केले. तर स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन मंडळाचे अध्यक्ष अमित चुधरी, उपाध्यक्ष सुचित मेश्राम सचिव खुशाल जलवार सहसचिव यश पुसाम कोषाध्यक्ष भूषण टेकाम क्रीडा सुचक कैलास बोरकुटे क्रीडा प्रमुख भगवान पुसान मंगेश मेश्राम आणि त्यांच्या टीमने मिळून केले.