✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.23फेब्रुवारी):-लहान मुलांना ज्ञान सर्जन करण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील पहिली पायरी म्हणजे अंगणवाडी मात्र गेवराई तालुक्यातील तलवाडा हद्दीतील मनुबाई जवळा येथील अंगणवाडीतील लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात आळ्या आणि जाळ्या आढळून आल्याची गंभीर बाब दि.२२ फेब्रुवारी रोजी उघडीस आली आहे. मनुबाई जवळा येथील अंगणवाडीत चार दिवसांपूर्वी लहान मुलांचे खाद्य आले होते.
मुलांना पोषण आहार देण्यासाठी ते उघडून बघितले असता त्यातील गव्हाच्या भरड्यामध्ये आळ्या आणि जाळ्या आढळून आल्या अंगणवाडी सेविकांचे या गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. गावचे सरपंच दिगंबर संदिपान खरात आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी सहज पाहाणी केली असता हा प्रकार समोर आला आहे.
शून्य ते पाच वयोगटातील बालकांना कुपोषणापासून दूर ठेवण्यासाठी अंगणवाडीमध्ये पोषण आहार दिला जातो. मात्र आता हाच पोषण आहार बालकांच्या जीवावर उठतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच शासन हे लहान मुलांच्या आरोग्याशी खेळत आहे की काय? इतके निकृष्ट दर्जाचे अन्न लहान मुलांना देत आहेत. इतके खराब अन्न कुत्रेही खाणार नाहीत. इतके खराब अन्न लहान मुलांना खायला देतात अशी संताप्त प्रतिक्रिया पालक वर्गातून व गावकऱ्यांच्या तोंडातून येत आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.