Home महाराष्ट्र गरीब घरकुल लाभार्थ्यांसाठी रेती उपलब्ध करा..!

गरीब घरकुल लाभार्थ्यांसाठी रेती उपलब्ध करा..!

104

🔸मन्याळी ग्रामस्थांचे एसडीओंना निवेदन

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.21फेब्रुवारी):- तालुक्यातील अतिदुर्गम जंगलव्याप्त बंदी भागातील मन्याळी गावात शासनाकडून मंजूर झालेल्या 45 ते 50 एसटी, एससी, ओबीसी घरकुल लाभार्थ्यांना शासकिय दरात रेती उपलब्ध करून 31मार्चपर्यन्त बांधकामाचे असलेले उदिष्ट पूर्ण करण्यात सहकार्य करा अशा आशयाचे निवेदन मन्याळी येथील घरकुल लाभार्थ्यांनी उपविभागिय अधिकाऱ्यांना दिले आहे.

उमरखेड तालुक्यातील अतिदुर्गम जंगलव्याप्त बंदी भागातील मन्याळी येथील अनुसुचित जाती, जमाती व इतर मागासवर्गिय गरजू 45 ते 50 लोकांना शासनाने घरकुल मंजूर केले आहे.

परंतु यंदा तालुक्यातील रेती घाटांची हर्राशी न झाल्याने घरकुल बांधकामासाठी लागणारी रेती मिळत नसल्याने अनेक गरजू गरिबांची बांधकामे रखडली आहेत.

चोरट्या मार्गाने रेती पुरविणाऱ्या रेती तस्करांकडून तसेच मराठवाड्यातील 27 हजार रुपयांमध्ये अडीच ब्रास रेती एका घरकुल बांधकामाला लागणारी सात ते आठ ब्रास रेतीचे 😯 हजार रुपये किंमत मोजून विकत घेणे गरजूंना परवडत नसल्याने गरीबांची घरांचे बांधकाम रेती अभावी ठप्प झाले आहे.

शासनाच्या नियमानुसार 31 मार्च पर्यन्त बांधकाम पूर्ण करावे अन्यथा कार्यवाही करण्यात येईल अशी दवंडी गावात प्रशासनाच्या वतिने देण्यात आल्यामुळे गरजू घरकुल धारक लाभार्थी चिंताग्रस्त झाले आहेत.

त्यामुळे शासनाने रेतीचा प्रश्न तत्काळ सोडवून घरकुल धारकांना न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते संतोष गवळे यांच्या नेतृत्वात मन्याळी येथील सरपंच आशाताई मनवर उपसरपंच श्रीराम पवार, उत्तम काळबांडे बालभारत नटवे दत्ता काळबांडे अशोक वाडेकर प्रकाश वाढवे सिद्धार्थ काळबांडे उत्तम काळबांडे आदिंनी उपविभागिय अधिकाऱ्यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here