🔹ऑटो चालक-मालक संघटनेच्या वतीने आयोजन
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रह्मपुरी (दि. 21 फेब्रुवारी):- ब्रह्मपुरी येथील ऑटो चालक-मालक संघटना ब्रम्हपुरी व ख्रिस्तानंद चौक मित्र परिवार याच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर ख्रिस्तानंद चौकात मोठ्या प्रमाणात महाप्रसादीचे वितरण करण्यात आले.
महाप्रसाद वितरण सोहळ्याप्रसंगी फादर कुरियन ख्रिस्तानंद हॉस्पिटल ब्रह्मपुरी, सुप्रसिद्ध डॉ. प्रशांत झोडे, नगरसेवक मनोज वठे, पत्रकार गोवर्धन दोनाडकर सचिव तालुका पत्रकार संघ ब्राम्हपुरी,गुप्ता साहेब,से. नि. पोलीस मेंढे,हिरालाल मेश्राम, डाँ. वेरुळकर, तिजारे साहेब, असोसिएशनचे अध्यक्ष हरीश सोरते ,व अन्य मान्यवर उपस्थित होते.
ऑटो चालक-मालक संघटनेच्या वतीने महाप्रसाद वितरण सोहळ्याप्रसंगी नगरसेवक मनोज वटे डॉ. प्रशांत झोडे व पत्रकार गोवर्धन दोनाडकर यांनी भगवान शिवशंकर (महादेव)व रयतेचे राजे हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व कोणत्याही संघटना चालवत असताना कसल्या प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. त्या अडचणींना जो सामोर जातो तो जीवनामध्ये यश संपादन करतो.
या चौकात गेल्या 40 वर्षापासून सुरू आहेत हे पुढे सुरळीत चालू ठेवावे असे आव्हान याप्रसंगी करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालक व आभार प्रदर्शन नरेंद्र मेश्राम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऑटो चालक-मालक संघटना ब्रह्मपुरी व ख्रिस्तानंद चौक मित्र परिवारचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले.