Home नागपूर गुरू रविदास आणि शिवाजी महाराज जयंती संपन्न

गुरू रविदास आणि शिवाजी महाराज जयंती संपन्न

97

✒️नागपुर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नागपूर(दि.21फेब्रुवारी):-दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघ नागपूर आणि संत शिरोमणी रविदास बहुउद्देश्य संस्था हुडकेश्वर रोड द्वारा संत शिरोमणी गुरु रविदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मा. रामदासजी भागवतकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.या कार्यक्रमानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला.४६ दात्यांनी रक्तदान केले.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धेतील प्रथम,द्वितीय,व तृतीय क्रमांकांना भारतीय संविधान,रोख व सन्मानपत्र देण्यात आले.इतर सहभागींना रोख व सन्मानपत्र देण्यात आले.

प्रमुख मार्गदर्शक माजी प्राचार्य जनार्दनजी वाघमारे सर यांनी गुरु रविदासांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.राष्ट्रीय चर्मकार महासंघ चे नागपूर विभागीय अध्यक्ष मा. लिलाधर कानोडे यांनी समाजावर आजही होणाऱ्या अत्याचारासाठी शासनाच्या बेपर्वा वृत्तीचा निषेध केला.समाजाने राष्ट्रीय चर्मकार महासंघात संघटित होऊन अन्याय अत्याचाराचा मुकाबला करावा असे आवाहन केले.

राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष मीनाताई भागवतकर यांनी सार्वजनिक जीवनात कार्यरत महिलांना कुटूंबाची साथ मिळण्याची गरज आहे असे सांगितले.गोपीजी गवळी यांनी अंधश्रद्धांमूळे होणाऱे भीषण परिणाम कथन केले.अजय बोढारे,डी.डी.सोनटक्के यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय चर्मकार महासंघ नागपूर चे सचिव ज्ञानेश्वर काकडे यांनी केले.संचालन श्नारायण मालखेडे यांनी तर आभार प्रदर्शन अनिल काटोले यांनी केले.आदर्श लाॅन, हुडकेश्वर रोड नागपूर येथे झालेल्या या कार्यक्रमाला समाज बांधवांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमानंतर स्नेहभोजन झाले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष महादेव बिंझाडे ,विजय चंदनकर,मनोहर गोडे,योगेश गोडे,संदीप सातपुते, प्रभाकर राजूरकर,दीपक पवार,राजेश सोपानकर,आशीष ठोंबरे,अशोक जोनवाल,महेंद्र मालखेडे, राजकुमार डाहाके,अनील भागवतकर,विठ्ठल चरडे,भाऊराव सातनुरकर, रवी काटोले, दिलीप भागवतकर,अनील पोरटकर,गजानन येटरे,नरेंद्र काटोले, प्रकाश भागवतकर,विजय इंगळे सुरेश मालखेडे,सुनील येटरे, उमाकांत ,प्रमोद मालखेडे ,प्रशांत ठाकरे, देविदास पैकुजी काटोले, करुणा काटोले, आशा सातनुरकर, रत्नमाला गोडे ममता गोडे, नलिनी जोनवाल,प्रांजली चंदनकर,कुसुम राजुस्कर,गायत्री बांडाणे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here