✒️नागभीड(पुरोगामी न्युज नेटवर्क)
नागभिड (दि.21फेब्रुवारी)-ग्रामस्तरावर विविध शैक्षणिक, सामाजिक, विकास भिमुख योजना व उपक्रम राबवुन सरपंच ॲड. शर्मिला रतनकुमार रामटेके यांनी नवेगाव पांडव गावाचे नाव महाराष्ट्रात नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे. त्यांच्या एकंदरीत सर्व कामाची दखल घेत त्यांना प्रकृती संस्था तर्फे मानाचा “वसुधा स्मृती पुरस्कार मिळाला आहे.
हा पुरस्कार त्यांना “मैगसेस पुरस्कार प्राप्त ” मान.राजेंद्र सिंग (Waterman of India ) राजस्थान व मान. कमलकिशोर फुथने ,Dy .Commissioner. नागपुर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. 7 सात हजार रूपयांचा चेक ,शालश्रिफळ, ट्राफी, प्रमाणपत्र देवुन त्यांना गैरवण्यात आले. नुकतेच अमेरिकेत राहणारे संतोष बिनवडे यांनी महाराष्ट्राच्या 11 टॉपर सरपंचा चा पुस्तक छापले त्यात ॲड. शर्मिला रतनकुमार रामटेके यांचे नाव व त्यांनी केलेले कामांची दखल घेतली आहे. त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळालेले आहे.
त्यांना मिळालेले रोख सात हजार रुपये त्यांनी ( RSCD) Resources and Support Center for Development या संस्थेला देण्याचे ठरवले असून 2,000 रू गावातील मुलांना क्रीडा साहित्य करिता देण्याचे ठरवले आहे. ग्रामपंचायत नवेगाव पांडव साठी ग्राम वासीयांचे कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, राजकिय, शैक्षणिक , संस्कृतिक आणि सर्वच क्षेत्रात सामोरे गेलो पाहीजे यासाठी ते प्रयत्न रत आहे. .आपल्या गावाचे नाव मोठे होत आहेत याबद्दल गाववासियांना त्यांचा अभिमान आहे व त्यांनी त्यांच्या कार्याला अभिनंदन केले आहे.