Home महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीची बीजे रोवली – डॉ. बबनराव तायवाडे – कवडू...

छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीची बीजे रोवली – डॉ. बबनराव तायवाडे – कवडू लोहकरे यांच्या ‘ध्येयवेडा’ पुस्तकाचे प्रकाशन

111

✒️चिमूर प्रतिनिधी(बालू सातपुते)

चिमूर(दि.21फेब्रुवारी):-छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकत्र घेऊन स्वराज निर्माण केले व राज्यांनी खऱ्या अर्थानी त्यांच्या काळात लोकशाहीची खरी मूल्य जोपासली असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बबनराव तायवाडे यांनी केले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाव्दारे २१ फेब्रुवारीला एन. डी. हाॅटेल येथे शिवजन्मोत्सव व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला प्रा. डॉ. अशोक जीवतोड, सचिन राजूरकर, दिनेश चोखारे, बबनराव फंड, गजानन गावंडे अनिल शिंदे, राजू चौधरी, अनंत बारसागडे, शाम लेडे, रजनी मोरे, नितीन कुकडे, रणजित डवरे, देवराव दीवसे, प्रकाश चालुलकर, रवींद्र टोगे उपस्थीत होते. यावेळी नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या वतिने त्यांच्या पत्नी सौ सीमा अडबाले यांनी सत्कार स्वीकारला. या दरम्यान वृक्ष , जल, वन्यजीव ऐतिहासिक वारसा, सर्प जनजागृती, पक्षी संवर्धन, ओबीसी लढा आदि श्रेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवून आपल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाने परिचत असलेले व चिमूर तालुक्यात पर्यावरण संवर्धनाची चळवळ निर्माण करणारे पर्यावरण प्रेमी कवडू लोहकरे यांच्या ‘ध्येयवेडा’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डाॅ. अशोक जीवतोडे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रवक्ता ऋषभ राऊत, यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे यांनी आपल्या स्वागत पर भाषणात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यावर प्रकाश टाकला. या वेळी नव निर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणजित डवरे यांनी केले, संचलन रंगराव पवार व हितेश लोडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here